Download App

परदेश दौऱ्यांवर 45 कोटींचा खर्च, फडणवीसांच्या OSD च्या कंपनीला परीक्षेचं काम; रोहित पवारांचे आरोप

  • Written By: Last Updated:

मुंबई : तलाठी भरती परीक्षेत मोठा घोटाळा झाल्याचा आरोप विरोधकांकडून केला जातोय. या घोटाळ्याची एसआयटी चौकशी करावी, अशीही मागणी होते. दरम्यान, मंत्र्यांचे परदेश दौरे आणि राज्यातील नोकरभरती परीक्षेतील घोटाळ्यावरून शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी राज्य सरकारवर सडकून टीका केली. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावरही त्यांनी अनेक गंभीर आरोप केले आहेत. फडणवीस यांच्या ओसडीच्या कंपन्या असून त्यांच्या संबंधित कंपन्यांना परीक्षेचे काम मिळतं असा आरोप त्यांनी केला.

Rockstar DSP: रॉकस्टार डीएसपीचा लंडन दौरा आजपासून सुरू 

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मुंबई येथील प्रदेश कार्यालयात रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी, प्रदेश सरचिटणीस राजेंद्र पवार, ओबीसी सेलचे राज्यप्रमुख राज राजापूरकर, ॲड. निलेश भोसले, पंकज बोराडे व इतर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी रोहित पवार म्हणाले, 23 नोव्हेंबर 2023 रोजी आम्ही एमआयडीसीकडून (MIDC) काही माहिती मागवली. यामध्ये कोणी परदेश दौरे केले, त्यावर किती खर्च झाला, याची माहिती मागविण्यात आली होती. दाओसमध्ये 32 लाख रुपये खर्च करण्यात आले. आतापर्यंत विविध परदेश दौऱ्यांवर 42 ते 45 कोटी रुपये खर्च झाले आहेत. तैवान देशात मंत्रीमहोदय गेले नव्हते, तर केवळ अधिकारी गेले होते. देवेंद्र फडणवीस यांचे OSD कौस्तुभ ढवसे कशासाठी गेले होते. यासाठी 1 कोटी 88 लाख रुपये खर्च करण्यात आले. इतका खर्च कसा झाला? तुम्ही खाजगी जेटने गेला होता का? कारण 5 लोकांवर 60 लाख रुपये कसे खर्च केला ? असा सवाल रोहित पवार यांनी केला आहे.

‘तुम्हाला पक्ष, राज्य सांभाळता आलं नाही, CM पदही…’, चित्रा वाघांची ठाकरेंवर जहरी टीका 

रोहित पवार म्हणाले, सरकारी आणि सरळ भरती परीक्षांमध्ये गरीब विद्यार्थ्यांकडून हजार रुपये फी घेतली जाते. आणि दुसरीकडे दौऱ्यावर 60-70 लाख खर्च केले जातात. मग या सर्वसामान्य विद्यार्थ्यांकडून सरकारी परीक्षांसाठी एवढी फी का आकारली जात आहे ? असा सवाल त्यांनी केला. शासकीय पैशावर एमआयडीसीच्या पैशावर हे जे काही पर्यटन झालेले आहे त्याची इन्क्वायरी व्हावी अशी मागणीही रोहित पवारांनी केली.

‘तुम्हाला पक्ष, राज्य सांभाळता आलं नाही, CM पदही…’, चित्रा वाघांची ठाकरेंवर जहरी टीका 

महाराष्ट्रात ५ लाख तरुणांना नोकरीच्या संधी मिळणार होत्या ते सर्व प्रकल्प गुजरातला नेले गेले. राज्यातले सरकार हे गुजरातच्या मदतीचे सरकार आहे, अशी टीकाही त्यांनी केला.

एखादा न्यूज चॅनल सरकारच्या विरोधात जर बातमी देत असेल आणि त्याला एक महिन्यासाठी बंद केले जात असेल तर ही सरकारची दडपशाही आहे, असंही रोहित पवार म्हणाले.

काल अटल सेतूचे उद्घाटन पंतप्रधान मोदींनी केलं. यावरही रोहित पवारांनी भाष्य केलं. अटल बिहारी वाजपेयी यांचे सेतूला नाव दिले गेले याचा आम्हाला आदर आहे, परंतु काल अटल साहेबांचा एकही फोटो दिसला नाही आणि त्या ठिकाणी नितीन गडकरी साहेबांची आम्हाला कमी भासली, असं पवार म्हणाले.

follow us