Rohit Pawar on Parth Pawar : महाराष्ट्रात राजकीय घडामोडींना वेग आलाय. लोकसभा निवडणुकीसोबतच राज्यसभा निवडणुकीचेही वेध लागले. राज्यसभेच्या सहा जागांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख १५ फेब्रुवारी आहे. त्यामुळं भाजप आणि कॉंग्रेसने आपले उमेदवार जाहीर केले. राष्ट्रवादी काँग्रेसही आपला राज्यसभेचा उमेदवार आज ठरवणार असल्याची शक्यता आहे. राज्यसभेसाठी राष्ट्रवादीत इच्छुकांची मोठी संख्या आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून पार्थ पवार (Parth Pawar) यांनी उमेदवारी देऊ शकते, अशी चर्चा आहे. यावर बोलतांना रोहित पवारांनी (Rohit Pawar) उपरोधिक टीका केली.
राज्यसभेची निवडणूक बिनविरोध? भाजप चौथा उमेदवार देणार नाहीच; बावनकुळेंनी सांगून टाकलं
आज माधम्यांशी बोलतांना रोहित पवार यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. यावेळी त्यांना पार्थ पवार यांच्याविषयी विचारले असता ते म्हणाले की, अभ्यासू लोकांना राज्यसभेवर पाठवलं जातं. पार्थ पवार हे त्या पद्धतीचे उमेदवार आहेत. एखादा विचारवंत राज्यसभेवर गेल्यास जर राज्याचं आणि देशाचं भल होईल असं जर अजित पवारांना वाटत असेल तर ते पार्थ यांना पाठवतील. हा त्यांचा व्यक्तीगत निर्णय आहे, असा टोला रोहित पवार यांनी लगावला.
Kanni Movie: व्हॅलेंटाईन डे दिवशी ‘कन्नी’ सिनेमाच्या टीमने केलं जोरदार सेलिब्रेशन
शरद पवार यांच्या पुण्यातील निवासस्थानी शरद पवार गटातील नेत्यांची बैठक झाली. या बैठकी नंतर शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार अशा चर्चा रंगल्या आहेत. यावरही रोहित पवारांनी भाष्य केलं. ते म्हणाले की, पक्ष विलीन करण्याबाबतची कोणतीही चर्चा झालेली नाही. कोणीतरी नेता येतो आणि काहीही सांगतो, आम्ही बैठकीत होतो. तिथं अशी कोणतीच चर्चा झाली नाही. शरद पवार यांच्यामुळेच आम्ही निवडून आलो आहोत. त्यामुळे सत्ता नसताना त्यांना सोडणं योग्य नाही. नाहीतर आम्हाला घरचेही माफ करणार ाहीत, असं रोहित पवार म्हटलं. यावेळी रोहित पवारांनी देवेंद्र फडणवीसांवरही भाष्य केलं. देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल बोलून वेळ वाया घालवायचा नाही. देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणीही त्यांनी केली
अजित पवार गटांना बंड केल्यानंतर आता निवडणुक आयोगाने पक्ष आणि पक्षाचं नावही अजित पवारांना दिलं. त्यामुळं शरद पवार गटातील आमदारांना कोणाचा व्हीप लागू होणार? असं विचारलं असता रोहित पवार म्हणाले की, जयंत पाटील यांचा व्हीप आमच्यावर लागू होईल.