Amol Khatal Exclusive Interview With Letsupp Marathi : महाराष्ट्रात काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. पक्षाचे जेष्ठ नेते आणि मुख्यमंत्री पदाचा चेहरा असलेले बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांचा संगमनेरमधून पराभव झाला. त्यांचा एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे अमोल खताळ (Amol Khatal) यांनी पराभव केला आहे. अमोल खताळ यांना 1 लाख 11 हजार 495 तर बाळासाहेब थोरात यांना केवळ 99 हजार 643 मते मिळाली आहेत. त्यांचा 11 हजार 852 मतांच्या फरकाने पराभव झालाय. यानंतर लेट्सअप मराठीने संगमनेर नवनिर्वाचित आमदार अमोल खताळ यांच्याशी संवाद साधला आहे.
यावेळी आमदार अमोल खताळ म्हणाले की, संगमनेर (Sangamner) तालुक्यातील स्वाभिमानी जनतेला अन् विखे साहेबांना विजयाचं श्रेय दिलंय. या विजयात विखे कुटुंबाचं खूप मोठं योगदान असल्याचं खताळ म्हणाले आहेत. महायुती सरकार अडीच वर्षांपूर्वी आलं. तेव्हा संगमनेरमधील अनेक समस्या सुटल्या आहेत. तेव्हापासून आम्ही समाजातील वंचित घटकांबरोबर संपर्क साधला. त्यांचे प्रश्न सोडवलेत. मला संजय गांधी निराधर समितीचं अध्यक्षपद मिळालं, त्यामुळे माझा जास्त लोकांशी संपर्क आला. केवळ सहा महिन्यांच्या काळातच लाडकी बहीण योजनेचे देखील अर्ज भरले गेले. माझ्या विजयात लाडक्या बहिणींचा देखील मोठा सहभाग आहे, असं नवनिर्माचित आमदार अमोल खताळ म्हणाले आहेत.
निवडणुकीत बॅलेट पेपर वापरा, सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळली अन् विचारले ‘हे’ प्रश्न
संगमनेरमध्ये सत्ता परिवर्तन होणार आणि आपला विजय होणार, याची मला व्यक्तिगत आणि पक्षातील नेत्यांना देखील खात्री होती. एका नवख्या युवकाविरोधात विरोधकांनी चार खासदार बोलावले होते. दोन माजी मुख्यमंत्र्यांच्या मुलांच्या देखील सभा झाला. त्याचवेळी आपला विजय निश्चित आहे, असं चित्र स्पष्ट झालं होतं. शिंदे साहेबांनी देखील माझं इतिहास निर्माण केला म्हणून जायंट किलर असं कौतुक केलं. समोरच्या उमेदवाराने मला हलक्यात घेण्याची चूक केली. ते कधी जमिनीवर राहिले नाही. त्यांनी कार्यकर्त्यांच्या भरवशावर राजकारण केलं अन् मला जनतेनं डोक्यावर घेतलं, अशी प्रतिक्रिया अमोल खताळ यांनी दिली आहे.
महाविकास आघाडीत बिघाडी होणार?, शिवसेना ठाकरे गटासोबत फारकत घ्या; काँग्रेसचा पक्षांतर्गत सूर
अर्ज दाखल केला, तेव्हाच मी म्हटलो होतो की मी पंधरा हजार मतांनी निवडून येणार. तेव्हा लोक माझ्यावर हसत होते. समोरच्यांच्या गाफिलपणामुळे आणि आमच्या गणिमीमुळे आमचा विजय झालाय. संगमनेर तालुक्यात चाळीस वर्षांपासून दहशत होती, ती फक्त बाहेर दिसत नव्हती. त्याच्या यातना संगमनेरकरांना भोगाव्या लागत होत्या. त्यांनी बाहेर सुसंस्कृत असल्याचा दिखावा केला होता. त्यांच्या खाजगी कार्यालयातून सगळे निकाल बनत होते. संगमनेर अवैध कामांचं केंद्र बनलं होतं. माझ्या कार्यकर्त्यांना मारहाण केली गेली, बॅनर फाडले. संगमनेर भयमुक्त केल्याचा निर्धार केलाय. 40 वर्षांत यांनी जनतेचा नाही, तर कुटुंबाचा विकास केला. रस्त्याच्या कामासाठी ठेकेदार यांचाच, भाऊ, त्यांचेच नातेवाईक. सत्तेचा वापर बगलबच्चे अन् कुटुंबासाठी केल्याचा आरोप केलाय. मला यश मिळालं यात त्यांच्याच कार्यकर्त्यांचा सिंहाचा वाटा आहे.
शिंदे साहेब पुन्हा मुख्यमंत्री झाले तर मला नक्कीच आनंद होईल. देवेंद्र फडणवीस जरी मुख्यमंत्री झाले तरी मला निश्चितच आनंद राहील, असं अमोल खताळ म्हणाले आहेत. महायुतीचे वरिष्ठ नेते जो निर्णय घेतील, मी त्याचं स्वागत करेन. सुजयदादांच्या पराभवाचा बदला घेतला, असं देखील ते म्हणालेत. हा बदला जनतेने घेतला आहे. परमेश्वराने मला एक संधी दिली आहे. मी सुजय दादांना वाढदिवसाचं गिफ्ट दिलंय. संगमनेरची भयमुक्तीकडे वाटचाल सुरू झालीय. अजिबात घाबरू नका,आपल्यामागे महायुतीचे नेते आहेत. आपल्याला आता विकासाचं राजकारण करायचं आहे, असं अमोल खताळ म्हणाले आहेत.\