ब्रेकिंग: सांगली जिल्हा बँक निवडणूक; गोपीचंद पडळकर 20 मतांनी विजयी!

Gopichand Padalkar; सांगली जिल्हा बँक निवडणूकीत आ. गोपीचंद पडळकर 20 मतांनी विजयी झाले आहेत.

Gopichand Padalkar Sangli District Bank Election

Gopichand Padalkar Sangli District Bank Election

Gopichand Padalkar Sangli District Bank Election: सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत जत सोसायटी गटातून आमदार गोपीचंद पडळकर यांनी विजय मिळवला आहे. या लढतीत पडळकर यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार विनोद पवार यांचा 20 मतांनी पराभव केला. पडळकर यांना 54 मते मिळाली, तर विनोद पवार यांना 34 मतांवर समाधान मानावे लागले. निकाल जाहीर होताच मतमोजणी केंद्रावर पडळकर समर्थकांनी जल्लोष करण्यास सुरुवात केली.

ब्रेकिंग- मंत्री जयकुमार गोरेंना 53 मतं मिळाली; जयकुमार गोरेंकडून त्यांचे बंधू शेखर गोरेंचा पराभव

सांगली जिल्हा बँकेच्या निवडणुकीत यापूर्वीच 15 जागा बिनविरोध झाल्या होत्या. त्यामुळे उर्वरित 6 जागांसाठी 13 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. या जागांसाठी मिरजेतील मार्केट यार्डमध्ये मतमोजणी प्रक्रिया पार पडली. 8 टेबलांवर 25 कर्मचाऱ्यांच्या मदतीने मतमोजणी करण्यात आली. यामध्ये जत सोसायटी गटातील लढतीकडे विशेष लक्ष लागले होते. या गटातून आमदार गोपीचंद पडळकर यांनी विजय मिळवत बँकेच्या राजकारणात आपले स्थान निर्माण केले आहे.

विजयानंतर बंधू ब्रह्मानंद पडळकरांची प्रतिक्रिया

गोपीचंद पडळकर यांच्या विजयानंतर त्यांचे बंधू ब्रह्मानंद पडळकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अनेकांनी गोपीचंद पडळकर यांना खिंडीत गाठण्याचा प्रयत्न केला; मात्र त्यांनी विरोधकांनाच खिंडीत गाठले, अशा शब्दांत ब्रह्मानंद पडळकर यांनी विजयावर भाष्य केले.

अहिल्यानगर जिल्हा बँक निवडणूक राहुरीतून आमदार प्राजक्त तनपुरे विजय

तसेच, जत तालुक्यातील अनेक नेत्यांनी या निवडणुकीत गोपीचंद पडळकर यांना मदत केली. त्यांच्या सहकार्यामुळे हा विजय शक्य झाल्याचे सांगत ब्रह्मानंद पडळकर यांनी मदत करणाऱ्या सर्व नेत्यांचे आभार मानले. दरम्यान, निकालानंतर मतमोजणी केंद्रावर समर्थकांकडून विजयाचा आनंद साजरा करण्यात आला.

 

Exit mobile version