Download App

काठ की हांडी दुबारा नही चढती, उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा नसतील, संजय निरुपम यांचा दावा

मुख्यमंत्रिपदाची स्वप्ने पाहणाऱ्या तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी आतापासूनच दावे करायला सुरुवात केली आहे. काठ की हांडी दुबारा नही चढती - निरुपम

  • Written By: Last Updated:

Sanjay Nirupam : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी (Vidhansabha Election) सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार कंबर कसली आहे. या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय नेते मोठमोठे दावे करत आहेत. आता शिवसेनेचे शिंदे गटाचे ज्येष्ठ नेते संजय निरुपम (Sanjay Nirupam) यांनी धक्कादायक दावा केला आहे. महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा नसतील, असा दावा त्यांनी केली.

धोतर घातलेल्या शेतकऱ्याला हाकलून देणे नडले ! सरकारच्या दणकाने जीटी वर्ल्ड मॉल बंद 

संजय निरुपम यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलतांना त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. ते म्हणाले की, शरद पवारांनी ठाकरेंच्या मनसुब्यांवर पाणी फेरले आहे. तिन्ही पक्षांमध्ये जागावाटपाबाबत चुरशीची स्पर्धा आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालामुळे या तिन्ही पक्षांना वाळवंटातील पाण्याचे छोटे स्रोत दिसत आहेत. पण, उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा नसतील, असं निरुपम म्हणाले.

धोतर घातलेल्या शेतकऱ्याला हाकलून देणे नडले ! सरकारच्या दणकाने जीटी वर्ल्ड मॉल बंद 

निरुपम म्हणाले, मुख्यमंत्रिपदाची स्वप्ने पाहणाऱ्या तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी आतापासूनच दावे करायला सुरुवात केली आहे. काठ की हांडी दुबारा नही चढती हे त्यांना कोण सांगणार.? दोन्ही निवडणुकांचे संदर्भ वेगळे आहेत आणि मुद्देही वेगळे आहेत. महाविकास आघाडीच्या तीनही पक्षांनी मुख्यमंत्री होण्याचा काल्पनिक पुलाव शिजत राहावा, असा खोचक टोला निरुपम यांनी लगावला.

महाराष्ट्रातील लाडकी बहिण आणि लाडका भाऊ योजनेमुळं महायुतीचे सरकार पुन्हा सत्तेत येईल, असा विश्वास निरुपम यांनी व्यक्त केला.

शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी ठाकरेंचा विश्वासघात झाल्याचं वक्तव्य केलं. त्यावर बोलताना निरुपम म्हणाले की, निरुपम म्हणाले, शंकराचार्यांना याची कल्पनी नसावी की, 2019 साली शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाच्या विचारधारेवर शिवसेना आणि भाजपने एकत्रित निडणूक लढवली. मात्र,निकालानंतर उद्धव ठाकरेंची मुख्यमंत्री होण्याची तीव्र महत्त्वाकांक्षा जागृत झाली आणि त्यांनी भाजपला धोका दिला. बाळासाहेब ठाकरे ज्या काँग्रेसच्या नेहमी विरोधात होते, त्या काँग्रेसशी हातमिळवणी करून, उद्धव ठाकरेंनीच भाजपशी गद्दारी केली, अशी टीका निरुपम यांनी केली.

follow us