राऊतांच्या तोफेने राहुल कुल यांना भरणार धडकी; उद्या होणार भव्य सभा

Sanjay Raut On Rahul Kul :  ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भीमा पाटस सारखान्यामध्ये भ्रष्टाचाराचा आरोप केला आहे. यावरुन त्यांनी भाजपचे आमदार राहुल कुल यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. यावरुन त्यांनी आता सीबीआयकडे धाव घेतली आहे. त्यांनी या प्रकरणाची तक्रार सीबीआयकडे केली आहे. माध्यमांशी बोलताना त्यांनी या विषयीची माहिती दिली आहे. यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री […]

Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 04 25T123919.991

Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out 2023 04 25T123919.991

Sanjay Raut On Rahul Kul :  ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भीमा पाटस सारखान्यामध्ये भ्रष्टाचाराचा आरोप केला आहे. यावरुन त्यांनी भाजपचे आमदार राहुल कुल यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. यावरुन त्यांनी आता सीबीआयकडे धाव घेतली आहे. त्यांनी या प्रकरणाची तक्रार सीबीआयकडे केली आहे. माध्यमांशी बोलताना त्यांनी या विषयीची माहिती दिली आहे. यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर देखील निशाणा साधला आहे.

भीमा पाटस कारखान्याचे आजी माजी संचालक माझ्याकडे येत आहेत. शेकडो कोटींचा भ्रष्टाचार राहुल कुल यांनी त्या कारखान्यामध्ये केला आहेत. हे सरळ सरळ मनीलॉंड्रिंग आहे. अनेक खोटे लोन दाखवुन पैसे घेण्याचे प्रकार झाले आहेत. त्या पैशाचा हिशोब न देणं असे प्रकाल झालेले आहेत.  हे सगळं प्रकरण मी या आधी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दोन वेळा पाठवलं आहे. त्यांच्या कार्यालयाची पोचपावती माझ्याकडे आहे, असे ते म्हणाले आहेत.

मुख्यमंत्री विसर्जित होणार, हे नक्की; आता पाटावर कोणता गुळाचा गणपती बसवणार, सामनातून टोलेबाजी

यासाठी मी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे वेळ मागितली आहे की, आपल्या महाराष्ट्रातल्या सहकार कारखान्यामध्ये सगळ्यात मोठ्या भ्रष्टाचाराचे प्रकरण सुरु आहे. आपण यात लक्ष घालावे.
त्यांनी मला अद्याप वेळ दिली नाही, असे ते म्हणाले आहेत. तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं मध्यंतरी एक वक्तव्य ऐकलं होतं, मी गृहमंत्री झाल्यामुळे काही लोकांना अडचण होत आहे. खासकरुन भ्रष्टाचार करणाऱ्यांच्या, असे ते म्हणाले होते.

पण देवेंद्र फडणवीस हे गृहमंत्री झाल्यामुळे भ्रष्टाचार करणाऱ्यांना अडचण झाली नसुन त्यांना संरक्षण मिळाले आहे. विशेषत: त्यांच्या पक्षातील लोकांनी अधिक संरक्षण मिळत आहे, असा टोला त्यांनी लगावला आहे. सध्या  राज्याचे गृहमंत्री काही करत नाही म्हणुन मी हे प्रकरण सीबीआयकडे पाठवलं, अशा शब्दात त्यांनी फडणवीसांना टारगेट केले आहे.

‘या’ मान्यवरांना मिळाला लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार, पाहा क्षणचित्रे

दरम्यान, त्यांनी भाजपचे आमदार राहुल कुल यांच्यावर देखील निशाणा साधला आहे. भीमा पाटस कारखान्याचे आजी माजी संचालक माझ्याकडे येत आहेत. शेकडो कोटींचा भ्रष्टाचार राहुल कुल यांनी त्या कारखान्यामध्ये केला आहेत. हे सरळ सरळ मनीलॉंड्रिंग आहे. अनेक खोटे लोन दाखवुन पैसे घेण्याचे प्रकार झाले आहेत, असेे ते म्हणाले आहेत. त्यामुळे उद्या संध्याकाळी ५ वाजता भीमा पाटस साखर कारखानाच्या परिसरामध्ये माझी सभा होणार आहे, असे त्यांनी सांगितले आहे.

Exit mobile version