Download App

वंचितशिवाय जागावाटप होणारच नाही; संजय राऊतांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं

Sanjay Raut On Prakash Ambedkar : गेल्या काही दिवसांपासून आगामी लोकसभेसाठी महाविकास आघाडीत (MVA) जागावाटपाच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. अशातच आता महाविकास आघाडीतील घटक पक्ष वंचित बहुजन आघाडीमधून (VBA) वेगवेगळ्या जागांवर दावे केले जात असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यावरच बोलताना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी स्पष्ट शब्दांत आपली भूमिका मांडली आहे. वंचित बहुजन आघाडीशिवाय महाविकास आघाडीत जागावाटप होणारच नसल्याचं संजय राऊतांनी स्पष्ट केलं आहे.

जागावाटपावरून महायुतीत खटके! शिवसेनाला २३ जागा मिळाव्यात, अन् धनुष्यबाण चिन्हावरच…; संजय मंडलिकांचे विधान

संजय राऊत म्हणाले, माध्यमांमध्ये इतर आकडे कुठून येतात हे मला माहित नाही. हे आकडे कोण देत त्याबद्दल माहित नाही पण जागावाटपाची चर्चा सुरु झाली आहे. प्रकाश आंबेडकरांची जागावाटपाच्या मुद्द्यावर शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यासोबत बैठक पार पडणार आहे. वंचितचे इतर नेतेही आमच्यासोबत चर्चा करत आहेत. आता जे काही आकडे असतील ते आम्ही सोबतच बसून जाहीर करणार आहोत. वंचित आमच्यासाठी महत्वपूर्ण असून त्यांच्याशिवाय जागावाटप होणारच नसल्याचं संजय राऊतांना सांगितलं आहे.

पुणे महापालिकेचा यू-टर्न; निलेश राणेंची पावणेचार कोटींची थकबाकी 25 लाखात सेटल

वंचित बहुजन आघाडी आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीत वंचितने 27 जागांची मागणी केल्याचं सांगितलं जात आहे. वंचितने ज्या जागा मागितल्या त्याची नावेही व्हायरल झाली आहेत. त्यातील अनेक जागांवर काँग्रेस, शरद पवार आणि अजित पवार गटाचे आमदार आहेत. तरीही वंचितने या जागा मागितल्या आहेत. काही काँग्रेस ज्या जागांवर सतत पराभूत होत आलेली आहे, अशा जागाही मागण्यात आल्या असल्याचंही सांगितल जात आहे. या वंचितच्या या भूमिकेवर बोलताना संजय राऊतांनी वंचितला सोडून जागावाटपावर चर्चा होणार नसल्याचं सांगितलं आहे.

रोजगार मेळावा हा मुख्यमंत्री अन् उपमुख्यमंत्र्यांच्या घरातलं लग्न आहे काय?
सरकारचा महारोजगार मेळावा बारामतीमध्ये होत आहे. ज्या विद्या प्रतिष्ठान येथे हा रोजगार मेळावा होत आहे, त्याचे अध्यक्ष शरद पवार आहेत. सरकारचा एक प्रोटोकॉल असतो कुठलाही सरकारी कार्यक्रम ठेवत असेल त्या ठिकाणचे विद्यमान खासदारांना आमंत्रण दिले जाते. तो सरकारी कार्यक्रम आहे, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या घरातल्या लग्नाचा कार्यक्रम नाही. हे हास्यास्पद आहे, हे कसले राजकारण असून भाजप सत्तेत आल्यापासून महाराष्ट्राला वाळवी लागली असल्याची टोलेबाजी संजय राऊतांनी केली आहे.

follow us