Download App

Sanjay Raut मंत्रालयाजवळचे झाड हलवा… भ्रष्टाचाराची १०० प्रकरणं पडतील!

  • Written By: Last Updated:

मुंबई : जे मंत्रिमंडळ विस्तार करू शकले नाहीत. ते सरकार कसले स्थिर आहे. ते कधीही कोसळू शकते. मंत्रालयाजवळचे झाड हलवलं तर भ्रष्टाचाराची १०० प्रकरणं खाली पडतील, अशी सडकून टीका उद्धव ठाकरे गटाचे राज्यसभा खासदार (MP) संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर केली.

Raj Thackeray नक्की काय वाचतात? सामना वाचतात का ? “घरी येतो पण…”

राज्यातील ४० आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार असल्यानेच राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार केला जात नाही, असे सांगत संजय राऊत म्हणाले की, देशातील राजकारणाची सध्याची स्थिती ही आणीबाणी पेक्षा गंभीर आहे. केंद्रातील सरकारला फक्त विरोधी पक्षाची लोकं दिसत आहे. सुडभावनेने विरोधकांवर कारवाई केली जात आहे. परंतु, २०२४ ला सत्ता बदलल्यावर तुम्हाला कोण वाचवायला येईल. देशात सध्या आणीबाणी पेक्षा गंभीर परिस्थिती आहे.

केजरीवालांचा भाजपला इशारा.. ‘सीबीआय’ला नको होती सिसोदियांची अटक; भाजपला चूक पडणार महागात

संजय राऊत म्हणाले की, केंद्र सरकार ईडी, सीबीआय सारखा यंत्रणाचा गैरवापर करत आहे. या यंत्रणांचा गैरवापर करून विरोधी पक्षातील लोकांना त्रास देऊन आपल्याकडे खेचले जात आहे. सर्रासपणे हा खेळ सुरु आहे. त्यांना वाटत आहे की आपल्या हातात सत्ता आहे. पण या देशातील जनता हे सर्व पाहत आहे, एक विसरू नका. एक दिवस जनता तुम्हाला सत्तेवरून खाली खेचेल. तेव्हा तुम्हाला कोण वाचवायला येणार आहे. हे लक्षात ठेवा, असा इशारा यावेळी संजय राऊत यांनी दिला.

Tags

follow us