Raj Thackeray नक्की काय वाचतात? सामना वाचतात का ? “घरी येतो पण…”

  • Written By: Published:
Raj Thackeray नक्की काय वाचतात? सामना वाचतात का ? “घरी येतो पण…”

“मी सामना आणि मार्मिक वाचत नाही, पण दोन्ही माझ्याकडे दोन्ही येतात पण मी वाचत नाही.” असं वक्तव्य मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी केलं आहे. राज ठाकरे यांनी आज मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने एका कार्यक्रमाला हजेरी लावली. त्यावेळी मराठी भाषा, पुस्तके, साहित्य यावर संवाद साधला पण राजकीय विषयावर येत्या गुढीपाडव्याला बोलणार आहे, असं त्यांनी सांगितलं.

मुलाखतीमध्ये राज ठाकरे यांना ते सामना आणि मार्मिक वाचतात का असा प्रश्न विचारला. त्यावर राज ठाकरे यांनी मी सामना आणि मार्मिक वाचत नाही, असं म्हटले. पण दोन्ही माझ्याकडे दोन्ही येतात पण मी वाचत नाही. न्यूजचॅनलही पाहतच नाही. सोबत वर्तमानपत्रात हव्या तशा बातम्या आता येत नसल्याचा टोला देखील त्यांनी लगावला.

हेही वाचा : मराठीसाठी मुख्यमंत्री करणार दिल्लीवारी; अभिजात दर्जासाठी मोदींना भेटणार

चरित्र वाचायला आवडतात

यावेळी राज ठाकरेंनी मला ठराविक लोकांची चरित्र वाचायला आवडतात, असं सांगितलं आहे. ते म्हणाले की डॉ. बाबासाहेब आंबेडकर, इंदिरा गांधी, सावरकर यांचे जीवन चरित्र वाचायला आवडतात. तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांचे चरित्र वाचायला आवडेत. दादा कोंडके यांचे एकटा जीव हे पुस्तक मी खूप वेळा वाचले आहे. ते पुस्तक वाचायला आवडते असेही राज ठाकरे यांनी सांगितलं.

लव्हस्टोरी वाचत नाही

या मुलाखतीमध्ये राज ठाकरे यांना कादंबऱ्या, लव्हस्टोरी वाचतात का ? असं विचारलं त्यावर त्यांनी, “मी झेपेल तेवढंच वाचतो.” असं उत्तर दिलं. ते पुढे म्हणाले की बाळासाहेब म्हणायचे, तुम्ही काय बोललो त्यापेक्षा काय दिलं हे महत्त्वाचे आहे. मी इतिहासाची पुस्तकं वाचतो, कांदबऱ्या वाचतो. पण मी फिक्शन आणि लव्हस्टोरी असं काही वाचत नाही. दुसरा प्रेम करतो, त्याचं काय चव घेऊन वाचायचं, त्याचं तो बघेल ना, असं म्हणताच एकच हश्शा पिकली.

यावेळी राज्यातील सध्याच्या परिस्थितीवर त्यांना विचारलं असता ते म्हणाले की, “महाराष्ट्रात जे सुरु आहे. त्यावर मी २२ तारखेला गुढीपाडव्याला शिवतीर्थावर बोलणार आहे. मला आता ट्रेलर दाखवायचा नाही. २२ तारखेला सिनेमाच दाखवणार आहे. महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल झाला. महाराष्ट्र असा कधीही नव्हता.” अशी खंत देखील त्यांनी व्यक्त केली.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube