Download App

…तर मी फडणवीसांच्या घराबाहेरही पत्रकार परिषद घेऊ शकतो!

  • Written By: Last Updated:

Sanjay Raut On Devendra Fadanvis :  ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषद घेत विविध मुद्द्यांवर भाष्य केले आहे. देशामध्ये होणारी विरोधकांची एकजूट,  तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर टीका केली होती, त्यावरुन देखील राऊतांनी भाष्य केले आहे.

महाराष्ट्रात आम्ही लोकसभेच्या ४० जागा जिंकू, असे राऊत म्हणाले आहेत. सध्या सगळे विरोधी पक्ष  एकत्र येत आहेत. सगळ्यांची बैठक झाली आहे. हे चांगले संकेत आहेत.  2024 साठी हे खूप चांगले संकेत आहेत. दिल्लीमध्ये शरद पवार आणि राहुल गांधी यांची भेट झाली. त्यामुळे सर्व विरोधक एकत्र येऊन या ठिकाणी लढा देतील, असे राऊत म्हणाले आहेत.

Ved Movie On OOT : वेडच्या चाहत्यांना आनंदाची बातमी, वेड चित्रपट पाहा ‘या’ ओटीटीवर

यावेळी त्यांनी भाजपवर देखील टीका केली आहे.  भाजपाचा भ्रम मोडणार आहे. त्यांना वाटतं की या ठिकाणी विरोधी पक्षांची एकजूनट मोडली  तर सर्व शक्य होईल पण तस होणार नाही. काँग्रेसचे नेते वेणू गोपाल हे उद्धव ठाकरे यांची मातोश्री येथे सोमवारी भेट घेणार आहेत.  तसेच ममता बॅनर्जी यांना देखील आम्ही आमंत्रण दिलं आहे. त्यांना देखील चर्चेसाठी बोलावलं आहे. महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या आम्ही 48 पैकी 40 जागा जिंकू अशी तयारी आहे, आणि आम्ही त्या जिंकूच, असे राऊत म्हणाले आहेत.

यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना देखील टोला लगावला आहे. मी 10 वाजता पत्रकार परिषद घेतो तर तुम्ही 9.30 वाजता पत्रकार परिषद घ्या, असे मी त्यांना आवाहन करतो. तसेच मी त्यांच्या सागर बंगल्याच्या बाहेर देखील पत्रकार परिषद घेऊ शकतो. या देशामध्ये लोकशाही आहे, असे राऊत म्हणाले आहेत.

राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसचे अनेक आमदार संपर्कात; फडणवीसांनी दिले मेगाभरतीचे संकेत, पक्ष प्रवेशाची वेळही सांगितली

तसेच मी माझ्या पक्षाचा मुख्य प्रवक्ता आहे. सामना या वृत्तपत्राचा ए़डिटर आहे. त्यामुळे माझ्या बोलण्याने त्यांना एवढा त्रास होण्याचे काय कारण आहे. तुम्ही विरोधकांना संपवण्याचे काम थांबवा मग आम्ही बोलणे थांबवू, असे म्हणत त्यांनी फडणवीसांना सुनावले आहे.

Tags

follow us