ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटावर निशाणा साधला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनुकळे यांनी 2024 साली विधानसभेच्या निवडणुकीत 240 जागा लढवणार व शिवसेना 48 जागा लढवणार असे विधान केले आहे. यावरुन राऊतांनी शिंदे गटावर हल्लाबोल केला आहे.
शिंदे गटाची हीच लायकी आहे. 2014 साली शिवसेनेने एका जागेसाठी युती तोडली होती, ती स्वाभिमानासाठी तोडली होती. आता त्यांच्यासमोर 40-45 जागांचे तुकडे फेकले जात आहेत. पुढेही त्यांच्यासमोर तुकडेच फेकले जातील. शिंदे गटाला आयुष्यभर तोंडात तुकडे घेऊनच जगावे लागेल, अशा शब्दात राऊतांनी शिंदे गटावर निशाणा साधला आहे. यांच्यामध्ये आता कोणताही स्वाभिमान राहिलेला नाही, अशी टीका राऊतांनी शिंदे गटावर केली आहे.
बावनकुळेंनी बॉम्ब फोडला : भाजप 240 तर शिवसेनेला फक्त 48 जागा देणार…
यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना टारगेट केले आहे. मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्र तरी माहित आहे का?, महाराष्ट्रात सध्या अवकाळी पावसाने सर्वत्र हाहाकार माजला आहे. शेतकऱ्याची अवस्था दयनीय झाली आहे. मुख्यमंत्र्यांनी त्यांना तातडीने मदत केली पाहिजे, असे राऊत म्हणाले आहेत.
या आंदोलनादरम्यान एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे. याला सरकार जबाबदार आहे. सरकारने निष्काळजीपणा दाखवल्याने या शेतकऱ्याच्या मृत्यू झाला आहे. याचे प्रायश्चित्त तुम्ही केलेच पाहिजे, असे राऊत म्हणाले आहेत.
‘मविआ’तील सगळेच पक्ष अनिल जयसिंघानी फिरला, त्यामुळे.. एकनाथ शिंदेंनी दिला इशारा
दरम्यान चंद्रशेखर बावनकुळे यांनी जागा वाटपाच्या मुद्द्यावरुन घुमजाव केला आहे. आमच्या दोन्ही पक्षामध्ये कोणतेही जागावाटप झाले नसून अद्याप जागा वाटपाचा फॉर्म्युला अद्याप ठरलेला नाही, असे बावनकुळे म्हणाले आहेत. निवडणुकीत 240 जागा लढवण्याचे वक्तव्य मी कार्यकर्त्यांना उर्जा देण्यासाठी व निवडणुकीसाठी सज्ज राहण्यासाठी केले, असे बावनकुळे म्हणाले आहेत.