Sanjay Raut Criticize to Sanjay Mandlik : कोल्हापूरचे खासदार आणि महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक ( Sanjay Mandalik ) यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीमंत शाहू महाराज ( Shahu Maharaj ) यांच्याबाबत खळबळजनक वक्तव्य केलं होतं. त्यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत ( Sanjay Raut ) यांनी मंडलिक यांच्यावर टीका केली. मंडलिक वारसदार आहेत का? महाराष्ट्राच्या श्रद्धास्थानांवर ज्या पद्धतीने चिखलफेक केली जात आहे हे लक्षण चांगले नाही. असं राऊत म्हणाले आहेत.
अजयच्या ‘मैदान’ला प्रेक्षकांची अधिक पसंती, वाचा पहिल्या दिवशी किती झाली कमाई
आज ( 12 एप्रिल ) पत्रकार परिषदेत बोलताना संजय राऊतांना संजय मंडलिकांच्या शाहू महाराजांबाबतच्या वक्तव्यावर प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, शाहू महाराज जर कोल्हापूरचे खरे वारसदार नसतील तपर मग काय मंडलिक आहेत का? तसेच या मंडलिकांचे वडिल सदाशिव मंडलिक शाहू महाराजांच्या खूप जवळ होते. शाहू फुले आंबेडकरांचे विचार घेऊनच राजकारणात काम करत होते. मात्र कोल्हापूरच्या गादीबद्दल महाराष्ट्राला आदर आहे. त्यामुळे पाया खालची जमील सरकत असल्याने महाराष्ट्राच्या श्रद्धास्थानांवर ज्या पद्धतीने चिखलफेक केली जात आहे हे लक्षण चांगले नाही. शाहू महाराज आधीपासून सामाजिक कार्यात कार्यरत आहेत. राजकीय स्वार्थासाठी मंडलिक यांनी अशी भाषा वापरावी, हे महाराष्ट्र सहन करणार नाही
काय म्हणाले संजय मंडलिक?
संजय मंडलिक यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीमंत शाहू महाराज (Shahu Maharaj) यांच्याबाबत खळबळजनक वक्तव्य केल्यानंतर त्यांच्यावर सर्व स्तरावरून टीका झाली. त्यामुळे अखेर त्यांनी आपल्या वक्तव्यावर स्पष्टीकरण दिले. मंडलिक म्हणाले की, शाहू महाराजांबाबत बोलताना आपला शब्द चुकला. मात्र शाहू महाराज हेच कोल्हापूकरच्या गादीचे खरे वारसदार असल्याचं शाहू महाराजांनी सिद्ध करावं असं आव्हान देखील यावेळी मंडलिक यांनी दिलं आहे.
ठाकरेंच्या तिरक्या चालीने भाजप अस्वस्थ; जळगावात थेट उमेदवारच बदलणार?
दरम्यान आत्ताचे महाराज हे खरे वारसदार नाहीत, असं विधान संजय मंडलिक यांनी केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यामुळं कोल्हापूरचं राजकीय वातावरण चांगलचं तापलं आहे. महाविकास आघाडीने छत्रपती शाहू महाराजांना कोल्हापूर लोकसभेतून उमेदवारी देऊन सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. मात्र महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांनी आता प्रचारासाठी जोरदार कंबर कसली. ते सातत्याने शाहू महाराज आणि कॉंग्रेसवर टीका करत आहेत.
अशाच एका प्रचारसभेत बोलतांना संजय मंडलिक यांचा तोल सुटला. मंडलिक म्हणाले, आत्ताचे महाराज कोल्हापूरचे आहेत का? ते खरे वारसदार नाहीत. ते सुध्दा दत्तकच आले आहेत. त्यामुळे तुम्ही, आम्ही आणि कोल्हापूरची जनता हीच खरी वारसदार आहे. माझे वडील सदाशिवराव मंडलिक यांनी खऱ्या अर्थाने पुरोगामी विचार जपल्याचं मंडलिक म्हणाले.