Download App

Maharashtra Politics: ‘राहुल नार्वेकर चोरांचे सरदार म्हणून…; संजय राऊतांनी डिवचले

Maharashtra Politics: महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष आणि त्यांच्या संरक्षणाखाली सुरू असलेलं घटनाबाह्य सरकार हे संविधान विरोधी आहे. हे चोर आणि लफंगे यांचा सरकार चालवत आहेत. घटनात्मक पदावर बसलेली व्यक्ती त्यांना संरक्षण देत असेल तर या राज्यामध्ये काय चाललेलं आहे याची कल्पना न केलेली बरी. नार्वेकर सांगत आहेत विधिमंडळाचे अधिकार, सार्वभौमत्व याचा अर्थ असा नाही की, चोरी करून एखाद्याच्या घरात शिरावं आणि त्या घराच्या मालकाने चोराला आणि खुण्याला संरक्षण द्यावं अशी ही सार्वभौमत्वाची व्याख्या होत नाही. असे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी राहुल नार्वेकरांना (Rahul Narvekar) डिवचले आहे.

शिवसेनेचे 40 आमदार मुख्यमंत्र्यांसह आणि राष्ट्रवादीचे आमदार अजित पवारांसह हे लूट करून दुसऱ्या घरात शिरलेले आहेत. या दरोडेखोरांना विधानसभा अध्यक्षांनी सार्वभौमत्वाच्या नावाखाली संरक्षण देत असतील तर मला वाटतं राहुल नार्वेकर यांचं नाव या अध्यक्ष पदावरून देशाच्या काळ्या कुट्ट इतिहासात लिहिलं गेलं जाणार आहे. उद्या ते खुर्चीवर नसतील तेव्हा अशा व्यक्तींना रस्त्यावर फिरणं मुश्किल होईल. सर्वोच्च न्यायालय शिक्षा सुनावतं पण फासावर लटकवण्यासाठी जल्हादाची गरज असते ही जबाबदारी आता विधानसभा अध्यक्षांवर आहे, असा टोला संजय राऊत यांनी यावेळी लगावला आहे.

या चाळीस आणि इतर आमदारांना घटनात्मक फासावर लटकवण्याची जबाबदारी ही तुमच्यावर असणार आहे हे तुम्ही लक्षात घ्या. नार्वेकर चोरांचे सरदार हे म्हणून काम करत आहेत, की संविधानाचे रखवालदार म्हणून काम करत आहेत हे त्यांनी स्पष्ट करावे. जसे चौकीदार चोर आहेत तसे संविधान पिठावर बसलेले चोर आहेत असं म्हणण्याची वेळ महाराष्ट्रावर येऊ नये. आधीच्या राजपाल आणि या विधानसभा अध्यक्षांनी इतक्या वेळा न्यायालयाचा अपमान केला आहे. की त्यांना रोज न्यायालयाने फासावर लटकवले पाहिजे.अशी टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राहुल नार्वेकरांवर केली आहे.

Maharashtra Politics : ठाकरे गटाला धक्का! पक्ष अन् चिन्हाची सुनावणी पुन्हा लांबणीवर

जर ते मिलावट राम आम्हाला म्हणत आहेत तर तुम्ही नमक हराम आहात हा नमक हरामीपणा महाराष्ट्रात फार काळ चालणार नाही. त्यावर आमची कायदेशीर लढाई सुरू राहील. विधानसभेच्या अध्यक्षांनी आणि आधीच्या राज्यपालांनी न्यायालयाचा इतक्या वेळा अपमान केला आहे की, न्यायालयाने यांना रोज फासावर लटकावलं पाहिजे”,असंही राऊत म्हणाले.

Tags

follow us