Download App

विरोधी उमेदवारांकडे 20 ते 25 कोटी पोहोचले; संजय राऊतांचा गंभीर आरोप

  • Written By: Last Updated:

प्रशांत गोडसे, मुंबई प्रतिनिधी

Sanjay Raut Criticized On Uddhav Thackerays Bag Inspection In Wani : उद्धव ठाकरे यांची (Uddhav Thackeray) सोमवार वणी येथे प्रचार सभा आयोजित करण्यात आली होती. त्यासाठी ते हेलिकॉप्टरने वणीला दाखल झाले होते. हेलिपॅडवर ठाकरेंचे हेलिकॉप्टर पोहोचताच अधिकाऱ्यांनी हेलिकॉप्टरमधील त्यांच्या बॅगांची तपासणी करण्यास सुरुवात केली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी देखील संताप व्यक्‍त (Assembly Election 2024) केलाय. तर ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत देखील आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. आज पत्रकार परिषदेमध्ये संजय राऊत यांनी (Sanjay Raut) निवडणूक आयोगाने निपक्षपणे काम करावे, असं मत व्यक्त केलंय.

यावेळी संजय राऊत म्हणाले की, कोणाच्या गाड्या अडवतात. गरिबांच्या गाड्या तपासल्या जातात. उद्धव ठाकरे यांच्या बॅग तपसल्या गेल्या आहेत. आमच्याकडे पैसा आहे काय? असा सवाल यावेळी संजय राऊत यांनी विचारला आहे. विरोधी उमेदवारांकडे 20 ते 25 कोटी पोहोचले, असा आरोप देखील संजय राऊत यांनी केलाय. तसंच यावेळी त्यांनी आक्रमक होते मोदी-शाह यांच्या ताफ्यातून कसल्या बॅग उतरल्या, असं देखील राऊतांनी विचारलाय.

नावात इतकं काय.. झारखंडच्या उमेदवारांना विचारा; सारख्याच नावाच्या अपक्षांनी फोडलाय घाम

नाशिकमध्ये शिंदेच्या ताफ्यातून 15 बॅग उतरल्याचा आरोप संजय राऊत यांनी केलाय. उद्धव ठाकरे यांच्यावर टिका करताना भान ठेवा, असा टोला राऊतांनी राज ठाकरे यांना लगावला आहे. शरद पवार आणि उद्धव ठाकरे महाराष्ट्र स्वाभिमानाचा प्रचार करतात.राज ठाकरे काय बोलतात त्याला किमंत नाही, त्यांची स्क्रिप्ट गुजरातमधून आलीय. भाजपाने महाराष्ट्राला अंधारात ढकलण्याचं काम केलंय. मोदी-शाह राज्याला अंधारात ढकलण्यासाठी येताय, अशी टीका आज पत्रकार परिषदेत बोलताना संजय राऊत यांनी केलीय.

“..म्हणून २००४ मध्ये भुजबळांना CM केलं नाही”, शरद पवारांनी सांगितलं कारण

महाराष्ट्रात ज्या पद्धतीने पैशांचं वाटप सुरू आहे, ते निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांना दिसत नाही का? असा सवाल संजय राऊतांनी केलाय. एकनाथ शिंदे यांनी कधीही कोणतं आंदोलन केलं नाही. त्यांनी फक्त स्वत:ची कातडी वाचवून राजकारण केलंय. फक्त पैशाचं राजकारण केलंय. ते कधीही तुरूंगात गेले नाही. हे फक्त पोलिसांना आणि ईडीला घाबरून भाजपात गेलेली लोकं आहेत, असा टोला संजय राऊतांनी लगावला आहे.

 

follow us