Download App

‘बाळासाहेब असते तर जोड्यानेच मारले असते’; पाकिस्तानी संघाच्या स्वागतावर राऊतांचा संताप

Sanjay Raut : विश्वचषक स्पर्धेत (World Cup 2023) आज अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत-पाक (IND vs PAK) सामना रंगणार आहे. या सामन्याचा उत्साह शिगेला पोहोचलेला असतानाच राजकारणातही याचे पडसाद उमटू लागले आहेत. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पाकिस्तानी संघाच्या ग्रँड वेलकमवरून मोदी सरकारवर तुफान हल्ला चढवला. हे फक्त गुजरातमध्येच होऊ शकतं. मोदी आणि शहा यांच्या राज्यातचं होऊ शकतं, अशी खोचक टीका राऊत यांनी केली.

राऊत यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पाकिस्तानी संघाच्या स्वागतावरून मोदी-शहांना खडेबोल सुनावले. ते पुढे म्हणाले, गुजरात सरकारने हिंदुत्व गुंडाळून ठेवलं आहे. आम्हीच शिवसैनिक, आम्हीच बाळासाहेब ठाकरेंचे वारसदार असलेल्या एकनाथ शिंदेंनी यावर काहीतरी वक्तव्य दिलं आहे का, आज जर बाळासाहेब असते तर जोड्यानेच मारले असते. आम्हाला लाज वाटते, अशा शब्दांत संजय राऊत यांनी संताप व्यक्त केला. यावर शिंदे आता तरी बोला, मी तुमचा धिक्कार करतो, अशी टीका राऊतांनी मुख्यमंत्री शिंदेंवर केली.

सरकारच्या हातात दहा दिवस, आरक्षण घेणारच! सभेआधीच जरांगे पाटलांचा इशारा

हे फक्त मोदी शहांच्या राज्यातच होऊ शकतं

राऊत पुढे म्हणाले, गुजरातमध्येच असं होऊ शकतं. पंतप्रधान मोदी (PM Modi) हे नवाज शरीफ यांच्याकडे जाऊन बर्थडेचा केक कापू शकतात. पाकिस्तानच्या टीमचं भव्य स्वागत होतं हे फक्त गुजरातमध्येच होऊ शकतं. मोदी आणि शहा यांच्या राज्यातच होऊ शकतं. हे अन्य कोणत्या राज्यात झालं असतं तर भाजपाच्या टोळीने नंगानाच केला असता. एव्हाना आम्हाला देशभक्ती आणि हिंदुत्वाचे धडे शिकवले असते. पण, तुम्ही जे करताय ते चालतं का?, असा सवाल राऊत यांनी केला.

विधानसभा अध्यक्षांना कायदा कळत नाही का ?

काल सर्वोच्च न्यायालयाने आमदार अपात्रता प्रकरणाच्या सुनावणीवेळी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना कडक शब्दांत फटकारलं. यावरही राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. महाराष्ट्राची न्याय आणि सत्याची परंपरा आहे. संविधानाचं रक्षण करणारे लोक याआधी विधानसभा अध्यक्षांच्या खुर्चीत बसलेले होते. पण, हे कंत्राटी सरकार आलं. आता तर काय अध्यक्ष, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे कायद्यालाच मानण्यास तयार नाहीत. न्यायालय आम्ही मानत नाही. त्यामुळे न्यायालयाचे शेवटी कडक शब्दांत समज द्यावी लागली, असे राऊत म्हणाले. एखाद्या खुन्याला संरक्षण द्यावं, आश्रय द्यावा अशा प्रकारचं काम विधानसभेचे अध्यक्ष करत आहेत. त्यांना कायदा कळत नाही का?, असा सवाल राऊत यांनी केला.

पुण्याच्या बदल्यात बारामती! अजितदादा-भाजपमधील डील चंद्रकांतदादांनी फोडली

Tags

follow us