पुण्याच्या बदल्यात बारामती! अजितदादा-भाजपमधील डील चंद्रकांतदादांनी फोडली
पुणे : “पालकमंत्रीपद गेले म्हणून नाराज होण्याचे कोणतेही कारण नाही. मोठ्या कामासाठी केलेली ही एक छोटी तडजोड आहे, बारामती जिंकण्यासाठीच ही तडजोड केली आहे”, असे विधान उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री, माजी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी बारामती लोकसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत केले. मात्र त्यांच्या या विधानामुळे अजितदादा पुण्याचे पालकमंत्रीपद आपल्याकडे घेऊन आगामी काळात बारामती भाजपला जिंकवून देण्यासाठी मदत करणार आहेत का असा सवाल विचारला जात आहे. (Chandrakant Patil said that Ajit Pawar will help BJP in Baramati Lok Sabha constituency by taking the post of guardian minister of Pune.)
पुण्याचे पालकमंत्री होण्यासाठी अजित पवार यांनी आग्रही भूमिका घेतली होती. यावरुन चंद्रकांतदादा आणि अजितदादा यांच्यात मोठे शीतयुद्ध पाहायला मिळाले होते. त्यानंतर गत आठवड्यात शिंदे सरकारमध्ये सामील झालेल्या मंत्र्यांना पालकमंत्रीपदाचे वाटप करण्यात आले. यात चंद्रकांत पाटील यांच्याकडून पुण्याचे पालकमंत्रीपद अजित पवार यांच्याकडे देण्यात आले. मात्र हे पालकमंत्रीपद सोडणे म्हणजे बारामती लोकसभा मतदारासंघ जिंकण्यासाठी केलेली तडजोड असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले.
राष्ट्रवादीच्या माजी आमदाराचा मुक्काम तुरुंगातच! अजितदादांनी कुटुंबियांना भेट नाकारली
काय म्हणाले चंद्रकांत पाटील?
बारामती लोकसभा निवडणूक जिंकण्याची आता संधी आहे. या वेळी जिंकलो नाही, तर पुन्हा कधीच नाही. बारामती लोकसभा मतदारसंघ काबीज करण्यासाठी मतभेद बाजूला ठेवून काम करावे लागेल. पालकमंत्रिपद सोडण्यासाठी मी केलेली तडजोड ही राज्यात 48 पैकी 45 जागा निवडून आणण्यासाठी आणि नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठीची आहे. वरिष्ठ नेत्यांनी घेतलेल्या निर्णयाचा सर्वांनी आदर केला पाहिजे. पालकमंत्री नसलो, तरी माझी दोन्ही कार्यालये सुरूच राहणार आहेत. मी पूर्वीसारखाच पुण्यात काम करणार आहे. सर्वांना भेटणार आहे. पूर्वीसारखाच निधी आणणार आहे. त्यामुळे कोणताही विचार न करता कामे करणे योग्य राहणार आहे.
440 व्होल्टेजचा झटका देऊन बारामती जिंकू; चंद्रशेखर बावनकुळेंचे थेट सुळेंना ‘चॅलेंज’
440 व्होल्टेजचा झटका देऊन बारामती जिंकू : बावनकुळेंचे सुळेंना ‘चॅलेंज’
यंदा 440 व्होल्टेजचा झटका देऊन बारामती लोकसभा शंभर टक्के जिंकणार आहे. 51 टक्के मते घेऊन जिंकू असा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला. ते महाविजय 2024 अभियानाअंतर्गत बारामती लोकसभा मतदारसंघातील दौंडमध्ये बोलत होते. महायुतीमध्ये बारामती लोकसभेतून आम्ही नक्की विजयी होऊ. या महाविजयाचा संकल्प करण्याकरिता आजची बैठक होती. या बैठकीमध्ये सहाशे कमांडर कार्यकर्ते हे बारामती लोकसभेसाठी नियुक्त केले आहे. हे कार्यकर्ते साडेतीन लाख घरी जाऊन सरकारच्या योजनांची माहिती देणार आहे. संपर्क ते समर्थन अभियान राबविणार आहे. 51 टक्के मते घेऊन बारामती लोकसभा आम्ही जिंकणार आहोत.