Download App

‘सरकार आपल्या दारी अन् आम्ही दोघंही दिल्ली दरबारी’

सरकार आपल्या दारी अन् आम्ही दोघंही दिल्ली दरबारी, अशी अवस्था शिंदे-फडणवीस सरकारची झाल्याची जहरी टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर केली आहे. राज्य सरकारकडून नूकतंच खातेवाटप जाहीर करण्यात आलं आहे. त्यावरुन संजय राऊतांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांवर सडकून टीका केलीय.

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारांची घोषणा; श्रीकांत वाड, आदिल सुमारीवाला यांना पुरस्कार जाहीर

संजय राऊत म्हणाले, मला समजलं की सरकार नाशिकमध्ये येणार आहे. पण सरकार आपल्या दारी आणि आम्ही दोघेही दिल्लीच्या दरबारी, अशीच सरकारची अवस्था झाली आहे. तसेच अजित पवार यांचं राजकारणात वजन असून त्यांचे आणि आमचे राजकीय मतभेद आहे. त्यांच्या निर्णयाशी आम्ही सहमत नसून त्यांच कृती महाराष्ट्राला पसंत पडलेली नसल्याचं राऊतांनी म्हटलं आहे.

Ajmer 92 Teaser Out: मनाचा थरकाप उडवणारा ‘अजमेर 92’ चा टिझर प्रदर्शित

राज्याच्या राजकारणावरही त्यांना यावेळी सडेतोडपणे भाष्य केलं आहे. ते म्हणाले, राजकारणात कोणीही कशीही सौदेबाजी करतो, त्यामुळे मलई वगैरे मिळते, वर्षभर इतरांनी मलई खाल्ली. आता त्यांना वाटेकरी आले आहेत. त्यांच्यात स्वाभिमान असेल तर त्यांनी सरकरामध्ये राहता कामा नये, असा टोला राऊत यांनी लगावला.

दरम्यान, अजित पवार उत्तम अर्थमंत्री होते. त्यांनी आर्थिक शिस्त आणि आर्थिक घडी बसवण्याचा प्रयत्न केला. वर्षभरात बेफाम उधळपट्टी झाली, त्याला अजित पवार यांच्यामुळे चाप बसणार असल्याचंही राऊतांनी स्पष्ट केलं आहे.

Tags

follow us