Download App

मोदींनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर बोलणं टाळलं; संजय राऊत म्हणाले, ‘केवळ धर्माच्या नावावर…’

  • Written By: Last Updated:

Sanjay Raut on Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) हे आज महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असून त्यांनी नाशिकच्या काळाराम मंदिराला (Kalaram temple) भेट दिली. याआधी त्यांनी नाशिकमध्ये रोड शोही केला. मात्र, मोदींच्या या दौऱ्या दरम्यान कांदा उत्पादक शेतकरी आणि शेतकरी नेत्यांना पोलिसांनी प्रतिबंधात्मक नोटीस बजावून स्थानबध्द केलं. शिवाय, मोदींनी कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत ब्र ही उच्चारला नाही. दरम्यान, या सगळ्या घडामोडीवरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊ (Sanjay Raut) यांनी मोदी सरकारवर जोरदार निशाणा साधला. भाजपला केवळ धर्माच्या नावावर राजकारणाची भाकरी भाजण्याचं काम येतं, अशी टीका त्यांनी केली.

राम मंदिर प्राणप्रतिष्ठापनेसाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना निमंत्रण… 

काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारने कांद्यावर निर्यात बंदी लावली. त्यामुळं गेल्या दोन महिन्यांपासून राज्यात तीव्र संघर्ष सुरू आहे. अशातच कांदा निर्यातबंदीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पहिल्यांदा राज्याच्या दौऱ्यावर आले. विशेष म्हणजे, त्यांनी नाशिकमधील काळाराम मंदिराला भेट दिली. रोड शोही केला. भाषणही केलं. दरम्यान, पुढील काळात लोकसभा निवडणुका असल्यानं ते मोदी आपल्या कांदा उत्पादकांच्या प्रश्नांसंदर्भात काही घोषणा करतील हे अपेक्षा नाशिककरांना होती. मात्र, मोदींनी कांदा उत्पादक शेतकऱ्यांविषयी बोलणं टाळलं.

सोनं चोरलं, मातीत पुरलं अन् डिटेक्टरनं शोधलं; पुणे पोलिसांनी असा लावला चोरीचा शोध… 

त्यानंतर संजय राऊत यांनी ट्वीट करत पंतप्रधान मोदींवर टीकास्त्र डागलं. त्यांनी लिहिलं की, पंतप्रधान नरेंद्र मोदी नाशिकच्या काळाराम मंदिरात दर्शनासाठी आले, आनंद आहे! पण, दर्शन झाल्यानंतर थोडा वेळ काढून जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांनाही त्यांनी भेटायला पाहिजे होतं. नाशिक जिल्हा हा देशातील सर्वात मोठा कांदा उत्पादक जिल्हा आहे, मात्र कांदा निर्यातबंदीमुळे इथला शेतकरी पार कोलमडून पडलाय. पंतप्रधान या शेतकऱ्यांना का भेटले नाहीत? असा सवाल राऊत यांनी केला.

राऊत यांनी पुढं लिहिलं की, राजकारण करायला वेळ आहे. पण देशाला पोसणाऱ्या शेतकऱ्याच्या डोळ्यातले अश्रू दिसत नाहीत. भाजपला केवळ धर्माच्या नावावर राजकारणाची भाकरी भाजण्याचं काम येत, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे, असा हल्लाबोलही राऊत यांनी केला.

तर मोदींना काळाराम मंदिरात झाडू मारून स्वच्छता केली. याच मुद्यावरून ठाकरे गटाचे नेते विजय करंजकर यांनी टीकेची झोड उठवली. झाडू मारता मारत मोदी थेट गोरगरिबांचा पैसा काढून धनदांडग्यांच्या घशात घालत आहेत, अशी टीका त्यांनी केली.

follow us