सोनं चोरलं, मातीत पुरलं अन् डिटेक्टरनं शोधलं; पुणे पोलिसांनी असा लावला चोरीचा शोध…

सोनं चोरलं, मातीत पुरलं अन् डिटेक्टरनं शोधलं; पुणे पोलिसांनी असा लावला चोरीचा शोध…

Pune Crime : पुण्यात (Pune)सर्वजण जेव्हा नवीन वर्षाचं (New Year celebration)स्वागत करण्यात व्यस्त होते, त्याचं वेळची चोरांनी संधी साधली. पुण्याच्या रविवार पेठेतील राज कास्टिंग (Raj Casting)नावाच्या सराफी दुकानात 1 जानेवारीला पहाटे पाच किलो 323 ग्रॅम सोने आणि 10 लाख रुपयांची चोरी झाल्यानं एकच खळबळ उडाली. त्यानंतर चोरांनी दुकानातील सोनं चोरुन ते शेतात पुरुन ठेवलं. पण पोलिसांनी शिताफीने या चोरीचा तपास लावला. पोलिसांनी आरोपी सुनील कोकरे याच्यासह त्याच्या साथीदारांना पोलिसांनी (Pune Police)बेड्या ठोकल्या आहेत. सोन्याच्या दुकानातील चोरी करणाऱ्या कामगार सुनील कोकरे व त्याच्या साथीदारांना फरासखाना पोलिसांनी अटक केली आहे.

Satara News : खासदार श्रीनिवास पाटील यांच्या पत्नी रजनीदेवी पाटील यांचे निधन

31 डिसेंबरच्या रात्री राज कास्टिंग या सोन्याच्या दुकानाची आणि तिजोरीची चावी जुन्या कामगारापैकी कोणीतरी ती बनवून घेतली. त्यानंतर दुकान उघडून दुकानात घुसले. त्यानंतर तिजोरी बनावट चावीने उघडून त्यातील सुमारे तीन कोटी रुपयांचे 5 किलो 323 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागीने आणि 10 लाख 93 हजार 260 रुपयांची रोकड चोरुन नेली. दुकानाचे मालक दीपक माने यांनी फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रभू रामाच्या भक्तीत तल्लीन, टाळ वाजवला, भजन केलं; पाहा फोटो

गुन्ह्याच्या तपास करत असताना फिर्यादीच्या दुकानातील कामगार सुनील कोकरे हा त्याची आजी वारल्याचे सांगून त्याच्या गावाकडे दोन दिवसापूर्वी गेला होता. परंतु तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे निष्पन्न झाले की, सुनील कोकरे हा दोन दिवसांपासून पुण्यामध्येच असल्याचे आणि घटनेच्या वेळी घटनास्थळावर असल्याचे तपासात समोर आले. आरोपी सुनील कोकरे याच्यासोबत पुण्यात राहणारा त्याचा मित्र अनिल गारळे पुणे सोडून बाहेर गावी गेल्याचे समजले.

त्यानंतर फरासखाना पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक नीलेश मोकाशी व त्यांच्या स्टाफने सांगलीतील जतमध्ये तपासासाठी रवाना झाले. त्या पथकाने गुन्ह्यातील मुख्य आरोपी सुनील खंडु कोकरे व त्याचा साथीदार सिध्देश्वर उर्फ तानाजी राजाराम खांडेकर यास त्याच्या घरी कारंडेवाडी, ता-जत, जि-सांगली येथून ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखवताच आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली.

ही चोरी आपण अनिल गारळे व तानाजी खांडेकर यांच्या मदतीने केल्याचे सुनील कोकरे यानं सांगितले. मात्र गुन्ह्यातील मुद्देमाल हा त्यांचा त्यांचा दुसरा कोल्हापूरमधील साथीदार अनिल गारळेकडे असल्याचे सांगितले. त्यावेळी फरासखाना पोलिसांनी कोल्हापूरमध्ये जाऊन आरोपी अनिल गारळेला ताब्यात घेतले. त्यानंतर दोन्ही पथकानी ताब्यात घेतलेल्या तिन्ही आरोपींकना विश्वासात घेऊन चौकशी केल्यानंतर चोरलेला मुद्देमाल हा सुनील कोकरेकडेच असल्याची माहिती मिळाली.

आरोपींना सुनील कोकरे याच्या घरी कारंडेवाडी, ता-जत, जि- सांगली येथे गेल्यानंतर सुनील कोकरे यानं चोरी केलेलं सोनं आणि रोख रक्कम घराजवळील शेतात लपवल्याचे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी आरोपीच्या शेतामधून 2 किलो 983 ग्रॅम 5 मिलीग्रॅम सोनं व 7 लाख 73 हजार 70 रुपये रोख रक्कम जप्त केली.

उरलेलं सोनं आणि रकमेची आरोपी माहिती देत नसल्याने आरोपी सुनील खंडू कोकरेच्या मून गावी जावून त्याच्या घराची व शेताची झडती घेतली, त्यामध्ये 497 ग्रॅम सोनं आणि 1 लाख 50 हजार रुपयांची रोकड शेतामध्ये सापडली. शेतातील मुद्देमाल आरोपी सुनील कोकरे यांची आई राजश्री खंडु कोकरे, भाऊ अनिल खंडु कोकरे, नवनाथ खंडु कोकरे यांनी संगणमत करुन लपवल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्या पार्श्वभूमीवर राजश्री कोकरे, अनिल कोकरे, नवनाथ कोकरे यांना दाखल गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे.

त्यानंतर सांगली ग्रामीण, डी.एस.एम.डीचे मदतीने आरोपीच्या घराची व घराजवळच्या शेतात शोध घेतला असता एका पीव्हीसी पाईपमध्ये आरोपीने लपवून ठेवलेले 50 हजार रुपये जप्त केले. अशा प्रकारे गुन्ह्यातील आरोपींकडून एकूण 3 किलो 480 ग्रॅम 5 मिलीग्रॅम सोने आणि 9 लाख 73 हजार 70 रुपयांची रोकड जप्त केली आहे. दाखल गुन्ह्याचा अधिक तपास फरासखाना पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव गायकवाड हे करत आहेत.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube