Sanjay Raut : नागपूरमध्ये विकास दिसतो, तसे सुडाचे इमलेही उभे, राऊतांचा फडणवीसांना टोला

Sanjay Raut On BJP : ‘नागपूरला पूर्वी एक संस्कार आणि संस्कृती होती. नागपूरचा समाज हा अत्यंत सर्वव्यापी आहे. कला, साहित्य, संस्कृती, सर्व इथेच सुरू झालं आहे. इथेच राष्ट्रीय स्वंय सेवक संघाचं मुख्यालय आहे आणि येथेच दिक्षाभुमी आहे. मोठे मोठे मराठी साहित्यिक येथे आहे. इथेच आम्ही संघर्ष करणारे लोक पाहिले आहेत. पण आता येथे जसा विकास […]

...तर अडीच वर्षात ड्रग्जबाबत काय-काय होत होतं सगळं काढेल; फडणवीसांचा राऊतांना इशारा

Devendra Fadnavis

Sanjay Raut On BJP : ‘नागपूरला पूर्वी एक संस्कार आणि संस्कृती होती. नागपूरचा समाज हा अत्यंत सर्वव्यापी आहे. कला, साहित्य, संस्कृती, सर्व इथेच सुरू झालं आहे. इथेच राष्ट्रीय स्वंय सेवक संघाचं मुख्यालय आहे आणि येथेच दिक्षाभुमी आहे. मोठे मोठे मराठी साहित्यिक येथे आहे. इथेच आम्ही संघर्ष करणारे लोक पाहिले आहेत. पण आता येथे जसा विकास दिसतोय तसे सुडाचे इमले देखील इथेच उभे आहेत. विरोधी पक्षाच्या सभा होऊ नये म्हणून येथील भाजपचे आमदार मोर्चे कढतात, कोर्टात जातात. अशी टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे आजच्या पत्रकार परिषदेमध्ये पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांना त्यांच्या नागपूरविषयी केलेल्या वक्तव्यावर प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावेळी त्यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

आज संजय राऊत यांनी एक ट्विट केल होत. त्यामध्ये ते म्हणाले होते की, ‘नागपूर बदलत आहे. बदल स्पष्ट दिसतोय. याचे बरेचसे श्रेय नितिन गडकरी यांना द्यावे लागेल. 2024 ला नागपूरचे चित्रं पूर्ण बदललेले दिसेल. त्या बदलाचे श्रेय जनतेला द्यावे लागेल. सुडाचे इमले उध्वस्त होतील. आघाडीची सभा होऊ नये म्हणून भाजप आमदार मोर्चे काढतात. नागपूर इतके दुष्ट कधीच नव्हते.’

सावरकरांचा अपमान करणाऱ्यांसाठी उद्धव ठाकरे लाल गालिचा अंथरत आहेत; अनिल बोंडेंची टीका

यामध्ये त्यांनी नागपूरच्या विकासावर बोलताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना या विकासाचे श्रेय दिले. तर ‘सुडाचे इमले उध्वस्त होतील. आघाडीची सभा होऊ नये म्हणून भाजप आमदार मोर्चे काढतात. नागपूर इतके दुष्ट कधीच नव्हते.’ असं म्हणत भाजप आणि फडणवीसांवर टीकास्त्र देखील सोडलं आहे.

Exit mobile version