सावरकरांचा अपमान करणाऱ्यांसाठी उद्धव ठाकरे लाल गालिचा अंथरत आहेत; अनिल बोंडेंची टीका
राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी काही दिवसांपूर्वी सावरकरांविषयी आक्षेपार्ह विधान करून भाजपला डिवचलं होतं. त्यांच्या या वक्तव्यानंतर देशभर मोठा गोंधळ उडाला होता. भाजपने सावरकर गौरव यात्रा काढली होती. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) देखील स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान खपवून घेणार नाही, असं इशारा दिला होता. त्यामुळं सावरकरांविषयी महाविकास आघाडीत मतभेद असल्याचं स्पष्ट झालं होतं. मात्र, अद्यापही कॉंग्रेस आणि राहुल गांधी हे आपल्या भूमिकेवर आणि वक्तव्यावर ठाम आहेत. दरम्यान, आता आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी लवकरच मातोश्रीवर जाऊ उद्धव ठाकरेंची भेट घेणार असल्याचं बोलल्या जात आहे. यावर अनेक प्रतिक्रिया येत आहेत. भाजपचे खासदार अनिल बोंडे (Anil Bonde) यांनी उद्धव ठाकरेंवर खोचक टीका केली. जो माणूस सावरकरांना तुच्छ लेखतो, त्याच्यासाठी ठाकरे लाल गालीच्या अंथरताहेत अशी टीका बोंडे यांनी केली.
एक वृत्तवाहिनीशी बोलतांना बोंडे म्हणाले की, ध्दव ठाकरे यांच्या मातोश्रीवर स्वातंत्र्यवीर सावरकरांचा एक फोटो आहे. बाळासाहेब ठाकरे यांचं सिंहासन आहे. राहुल गांधी येत आहे तर कसं वाटेल स्वातंत्र्यवीर सावकरांना किंवा बाळासाहेब ठाकरेंना… ज्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेबांनी ठाकेरंनी सांगितलं होतं की, ज्याने स्वातंत्र्यवीर सावकरांचा अपमान केला, त्याला जोड्याने मारा. आणि आज त्याचं बाळासाहेबांचे पुत्र आणि नातू हे जो स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करतो, सावरकरांना तुच्छ लेखतो, त्यांची भेट घेत आहेत. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे सावरकरांचा अपमान करणाऱ्या राहुल गांधींसाठी लाल गालीच्या अंथरत आहेत. ही भेट त्यांच्या जीवाला चांगली वाटेल, पण बाळासाहेब ठाकरे आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांना स्वर्गामध्ये कसं वाटेल, याची कल्पनाीह करू शकत नाही, असं बोंडे म्हणाले.
सावित्रीबाई फुले विद्यापीठात चित्रीत केलेल्या ‘सल्तनत’ रॅप सॉंगवरुन वादंग
राहुल गांधींनी देशाबाहेर असतांना राहुल गांधींनी मोदी सरकारवर हल्ला बोल केला होता. त्यानंत राहुल गांधी यांनी माफी मागावी, अशी मागणी भाजपने केली. मात्र, सावरकर समझा क्या… मेरा नाम राहुल गांधी है, राहुल सावरकर नही, असं राहुल गांधी म्हणाले होते. त्यानंतर भाजप आक्रमक झाली होती. उद्धव ठाकरे देखील आक्रमक झाले होते. सावरकरांचा अपमान खपवून घेतल्या जाणार नाही, सज्जड दम त्यांनी दिला होता. त्यामुळं मविआ सावरकरांच्या मुद्द्यावरून एकमत नाही, हे स्पष्ट झालं. दरम्यान, आता राहुल गांधी हे उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर जाऊन भेट घेणार आहेत. त्यावरून बोंडेंनी राहुल गांधी यांच्यावर जोरदार निशाना साधला.
बोंडे म्हणाले की, उघड्या जवळ नागडा केला आणि रात्रभर थंडिन कुडकुडत मेला, ही अशी गत आहे. दोन अकर्तृत्वान लोक जेव्हा एकत्र येत असतात, तेव्हा बरबादीला सुरूवात होते, असा टोलाही त्यांनी ठाकरेंना लगावला.
राज्यात कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका लागल्या आहेत. अमरावती जिल्ह्यात भाजपने या निवडणुकीसाठी कॉंग्रेसशी युती केली. याबाबत बोडेंना प्रश्न विचारला असता त्यांनी सांगितले की, आम्ही कॉंग्रेस सोबत हातमिळवणी केली नाही. कॉंग्रेसमध्ये सहकारला माननारा जो गट एक आहे, आम्ही त्या गटासोबत हातमिळवणी केली आहे. महत्वाचं म्हणजे, सहकाराच्या निवडणुका ह्या पक्षाच्या चिन्हावर लढवल्या जात नाही. शिवाय, त्या पक्षाच्या अजेंड्यावरही लढवल्या जात नाहीत, असं बोडेंनी सांगिलतं.