Download App

Chandrakant Patil : नाराजी नाही, राजीनामा घ्या; राऊतांनी शिंदेंना खडसावले

Sanjay Raut on Eknath shinde : बाबरी पाडण्यात आली त्यावेळी बाळासाहेब ठाकरे आणि शिवसैनिकांची भूमिका होती की नव्हती या मुद्द्यावर भाजप नेते चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी दिलेल्या वक्तव्यावरून प्रचंड गदारोळ उठला आहे. ठाकरे गटाचे नेते संतप्त झाले असून उद्धव ठाकरेंनी देखील पाटील यांच्यावर तुफान हल्ला चढवला आहे. त्यानंतर चंद्रकांत पाटलांनी देखील पत्रकार परिषद घेत चंद्रकांत पाटील स्पष्टीकरण देताना म्हणाले, ‘माझ्यासारखा सर्वसामान्य कार्यकर्ता नेहमीच हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंबाबत श्रद्धा बाळगून आहे. त्याही मुलाखतीत मी हेच म्हटले होते.’ तसेचं त्यांनी उद्धव ठाकरेंना आपण फोन करून समजावणार असल्याचं म्हटलं होतं.

त्यावर आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, चंद्रकांत पाटील उद्धव ठाकरेंना फोन करणार आहेत की नाही आणि उद्धव ठाकरे त्यांचा फोन घेणार की नाही हे मला माहीत नाही. चंद्रकांत पाटील नेहमीच महापुरूषांबद्दल वादग्रस्त वक्तव्य करत असतात आणि आता त्यांनी कमेऱ्यासमोर बाळासाहेंबांबत वक्तव्य केलं आहे.

दुसरूकडे आपल्यााचं मंत्रीमंडळातील मित्र पक्षातील एका सहकाऱ्याने हिंदू ह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंबद्दल असं वक्तव्य केल्यानंतरही स्वतःला बाळासाहेबांच्या विचारांचे वारस म्हणणारे अयोध्येत जाऊन राजकीय उत्सव साजरे करणारे. मात्र बाळासाहेबांचा अपमान करणाऱ्यांच्या मांडिसा मांडी लावून बसतात. त्यांनी साधा या वक्तव्याचा निषेध केला नाही हे कसले बाळासाहेबांचे वारसदार. त्यामुळे त्यांना लाचार लोचट आणि मिंधे म्हणने चुकीचे नाही.

Sanjay Gaikwad : प्रभू रामाच्या जन्मावर आक्षेप घेणाऱ्या पक्षासोबत गेला आणि आम्हाला शहाणपणा शिकवता

त्यामुळे मागणी आहे की, बाळासाहेबांचा अपमान करणाऱ्यांना राज्याच्या मंत्रइमंडळामध्ये स्थान असता कामा नये. यावर राज्याचे मुख्यमंत्री आणि त्यांचे 40 जणांची टोळी भूमिका घेणार आहेत का? असा सवाल ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी एकनाथ शिंदेंना केला. तर मुख्यमंत्र्यांनी चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावर व्यक्त केलेल्या नाराजीवर देखील ते म्हणाले की, नाराजी नाही तर त्यांचा राजीनामा घ्यायला हवा. असं चंद्रकांत पाटील यांच्या राजीनाम्यावरून राऊतांनी शिंदेंना खडसावले आहे.

Tags

follow us