Download App

‘चार गद्दार टकल्यांना जनता जोडे-चपला मारेल’; संजय राऊतांचा गुलाबराव पाटलांवर हल्लाबोल

  • Written By: Last Updated:

UBT sabha jalgaon : चार टकले सोडून गेले, म्हणजे शिवसेना संपली का? जे सोडून गेले, ते गद्दार आहेत. ते आजही मोकळेपणाने फिरू शकत नाही. आपण गद्दारी केली, त्यामुळं जनता आपल्याला चपला-जोडे मारेल, अशी भीती या गद्दारांना आहे, अशा शब्दात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी गुलाबराव पाटील, किशोर पाटील यांचा समाचार घेतला.

https://www.youtube.com/watch?v=7DOsNyIkNfE

आज ठाकरे गटाची जळगावमध्ये सभा झाली. छत्रपती शिवाजी महाराज आणि सरदार वल्लभभाई पटेलांच्या पुतळ्यांचे अनावरण केल्यानंतर उबाठाची सभा झाली. यावेळी राऊत बोलत होते. ते म्हणाले, मुंबईत बसून देशाचं राजकारण करणारे दोनच नेते आपल्याकडे होऊन गेले, एक म्हणजे हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि दुसरं म्हणजे उद्धव ठाकरे. आम्हाला दिल्लीला सारखं जावं लागत नाही, आमचं देशाचं राजकारण मातोश्रीवरून चालतं, असं ठणकावलं.

पाणीपुरवठा मंत्र्याच्या गावात प्यायला पाणी नाही; दानवेंचा गुलाबरांवर घणाघात 

ते म्हणाले, या सभेला गर्दी जमेल का नाही, याची चिंता वाटत होती. जळगावची सेना संपली, असं सांगितल्या जायचं. मात्र, चार टकले गेले, म्हणजे काही शिवसेना संपली का ? हा समोर बसलेला जनसमुदाय खरी शिवसेना आहे, या सभेनं चार टकल्यांना धडकी भरली आहे. उद्धव ठाकरेंनी जळगावात येऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या आणि सरदार वल्लभभाई पटेलांच्या पुतळ्यांचं अनावरण करून नये, यासाठी चार टकल्यांनी प्रयत्नांची पराकाष्टा केली. मात्र, उद्धव ठाकरे आले, त्यांनी पाहिलं आणि त्यांनी जिंकलं. या खानदेशातील प्रत्येकाच्या मनात, आणि घरात शिवसेना आहे. जे सोडून गेले, ते गद्दार आहेत. ते आजही मोकळेपणाने फिरू शकत नाही. आपण गद्दारी केली, त्यामुळं जनता जनता चपला-जोडे मारेल, अशी भीती त्यांना आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांच्याच विचाराने सेना पुढं चालली आहे. महाराजांनी त्यांच्या हातातली त्यांनी तलवार शिवसेनेला दिली
यापुढं जिल्हाच नाही, तर विधानसभा, लोकसभा, महापालिका आम्ही जिंकल्याशिवाय राहणार नाहीत. छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या राज्याचं नेतृत्व केले, त्याच राज्याचं नेतृत्व आज उद्धव ठाकरेंनी सुरू केलं. भलंही सत्ता असो वा नसो, त्यांनी त्याचं काम सुरू ठेवलं. सत्ता परत मिळवण्याची धमक शिवसैनिकांत आहे. महाराष्ट्राचंचं नाही तर देशाचं नेतृत्व करण्याची जबाबदारी जरी त्यांच्यावर पडली तर आश्चर्य वाटालया नको, असं राऊत म्हणाले.

Tags

follow us