Download App

आम्हीही सकारात्मक! राज यांच्या प्रस्तावाला उद्धव ठाकरेंचा ‘ग्रीन सिग्नल अन् राऊतांनी दिला युतीचा संकेत

Sanjay Raut यांनी देखील राज ठाकरेंच्या प्रस्तावाला उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या उत्तराचा उल्लेख करत युतीचा संकेत दिला आहे.

Sanjay Raut on Raj Thackeray and Udhhav Thackeray Allince : मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी (Raj Thackeray) उद्धव ठाकरेंना युतीसाठीचा प्रस्ताव ठेवला आहे. महेश मांजरेकर यांना दिलेल्या मुलाखतीत राज ठाकरेंनीही भूमिका मांडली आहे. त्यावर लगेचच माझ्याकडून भांडण नव्हतीच मिटून टाकली चला असे म्हणत मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या युतीच्या टाळीला उद्धव ठाकरेंची प्रति टाळी दिली आहे.तर आता संजय राऊत यांनी देखील युतीचा संकेत दिला आहे.

काय म्हणाले संजय राऊत?

राज सुद्धा ठाकरे आहेत आणि उद्धव सुद्धा ठाकरे आहेत. ते दोघे भाऊ आहेत. त्यांचं नातं कायम आहे. उद्धव ठाकरे यांचा मार्ग कायम महाराष्ट्र हिताचा राहिला आहे.मी सुद्धा त्यांचं वक्तव्य ऐकलं आहे. महाराष्ट्र हितासाठी वाद मिटवायला तयार आहे. यावर उद्धव ठाकरे सुद्धा म्हणाले की, असलं तर मिटवायला वेळ लागणार नाही. फक्त भूमिका एवढीच आहे की, लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या वेळी उद्धव ठाकरे म्हणाले होते की, महाराष्ट्राच्या मुळावर येणारा जो आहे त्याच्यासोबत जाऊ नये. मात्र राज यांनी लोकसभेला भाजपाला साथ दिली होती. पण आता जर दोन्ही ठाकरेंनी साद आणि प्रतिसाद अशी भूमिका घेतली असेल तर स्वागत आहे. उद्धव ठाकरे यांनी भूमिका मांडल्यावर आम्ही प्रतीक्षा करू काय होतं. वेट अँड वॉच आहे, पण आम्ही सकारात्मक भूमिकेतून जात आहोत. संयुक्त महाराष्ट्र लढ्याच्या वेळेला अनेकांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतलेला होता. असं म्हणत राऊत यांनी देखील युतीचा संकेत दिला आहे.

काय म्हणाले उद्धव ठाकरे?

राज ठाकरेंनी दिलेल्या प्रस्तावावर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, किरकोळ भांडणं बाजूला ठेवायला मीही तयार आहे. सर्व मराठी माणसांच्या हितासाठी, महाराष्ट्राच्या हितासाठी एकत्र येण्याचं आवाहन करतोय. पण माझी अट एकच असून, माझ्यासोबत जाऊन हित की भाजपासोबत जाऊन हित ते ठरवा.जेव्हा आम्ही लोकसभेच्या वेळेला सांगत होतो, महाराष्ट्रातून गुजरातमध्ये कारभार घेऊन जात आहेत, तेव्हाच जर विरोध केला असता तर हे सरकार तिकडे बसलं नसतं.

जमीन मोजनीसाठी लाच न दिल्याने मालमत्तेचे नुकसान; पुण्यातील भूमि अभिलेख अधिकाऱ्यांचा प्रताप

महाराष्ट्राच्या हिताचा विचार करणारं सरकार केंद्रात बसवलं असतं. त्याचवेळेला हे काळे कामगार कायदे फेकून दिले असते. पण तेव्हा पाठिंबा द्यायचा,आता विरोध करायचा. मग तडजोड करायची, हे असं चालणार नाही. महाराष्ट्राच्या हिताच्या आड जो कोणी येईल, त्याचं स्वागत मी करणार नाही, त्याला घरी बोलावणार नाही, त्याचं आदरातिथ्य करणार नाही. त्याच्याबरोबर पंगतीला बसणार नाही, हे ठरवा आणि मग महाराष्ट्र हिताच्या गोष्टी करा”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

काय म्हणाले होते राज ठाकरे?

आज शिवसेना फुटली पण जर फुटली नसती तर, अजुनही तुम्ही (राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे) एकत्र येऊ शकतात का? हे संपूर्ण महाराष्ट्राचं स्वप्न आहे असे मांजरेकर म्हणाले. त्यावर बोलताना राज ठाकरे म्हणाले की, कोणत्याही मोठ्या गोष्टींसमोर आमच्यातील वाद, भांडण छोटी असून, महाराष्ट्र खूप मोठा असल्याचे उत्तर राज ठाकरेंनी दिले आहे. या महाराष्ट्राच्या अस्तित्वासाठी आणि मराठी माणसाच्या अस्तिस्वासाठी ही भांडणं, वाद आणि अन्स सर्व गोष्टी अत्यंत क्षुल्लक आहेत. त्यामुळे एकत्र येणं आणि एकत्र राहणं ही फार काही कठीण गोष्ट आहे असे मला वाटत नाही.

2019 नंतर पहिल्यादांच सौदी अरेबीयाच्या दौऱ्यावर जाणार PM मोदी, नेमकं कारण काय?

परंतु, विषय फक्त इच्छेचा असून, हा फक्त माझ्या एकट्याच्या इच्छेचा किंवा माझ्या स्वार्थाचापण विषय नसून, आपण महाराष्ट्राचा लार्जर पिक्चर पाहणे गरजेचे आहे आणि तो मी पाहतोच असे राज ठाकरेंनी म्हटले आहे. माझं म्हणणं आहे की सर्व राजकीय पक्षातील सर्व मराठी माणसांनी एकत्र येऊन एकच पक्ष काढावा असे राज यांनी मुलाखतीत म्हटले आहे. मी त्यांच्याबरोबर काम करावं? ही उद्धव ठाकरेंनी इच्छा आहे का? असा प्रश्नही राज यांनी विचारला आहे.

follow us