2019 नंतर पहिल्यादांच सौदी अरेबीयाच्या दौऱ्यावर जाणार PM मोदी, नेमकं कारण काय?

PM Modi Visit Saudi Arabia : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) पुढील आठवड्यात सौदी अरेबियाच्या (Saudi Arabia) दौऱ्यावर जाणार असल्याची माहिती भारत सरकारकडून देण्यात आली आहे. माहितीनुसार, सौदी अरेबियाच्या क्राउन प्रिन्स आणि पंतप्रधान मोहम्मद बिन सलमान (Mohammed bin Salman) यांच्या निमंत्रणावरुन 22 आणि 23 एप्रिल रोजी सौदी अरेबियाच्या अधिकृत दौऱ्यावर जाणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हा तिसरा सौदी अरेबियाच्या दौरा असणार आहे. यापूर्वी पंतप्रधान मोदी 2016 आणि 2019 मध्ये सौदीच्या अधिकृत दौऱ्यावर गेले होते. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, सप्टेंबर 2023 मध्ये क्राउन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांच्या नवी दिल्लीच्या राजकीय भेटीनंतर पीएम मोदी सौदीच्या दौऱ्यावर जाणार आहे.
क्राउन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांनी सप्टेंबर 2023 G20 शिखर परिषदेला उपस्थिती लावली होती. यावेळी त्यांनी भारत-सौदी अरेबिया स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप कौन्सिलच्या पहिल्या बैठकीचे सह-अध्यक्षपद भूषवले होते. परराष्ट्र मंत्रालयाने एका अधिकृत प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, धोरणात्मक भागीदार म्हणून, दोन्ही देश राजकीय, संरक्षण, सुरक्षा, व्यापार, गुंतवणूक, ऊर्जा, तंत्रज्ञान, आरोग्य, शिक्षण, संस्कृती आणि लोकांमधील संबंध यासह विविध क्षेत्रात मजबूत द्विपक्षीय संबंध सामायिक करतात. गेल्या अनेक वर्षांपासून भारत आणि सौदी अरेबियाचे संबंध ऐतिहासिक आहे.
1 मेपासून देशात उपग्रह आधारित टोल सिस्टीम? केंद्र सरकारच्या उत्तराने मिटला संभ्रम
भारत-सौदी अरेबियामधील व्यावसायिक संबंध
दोन्ही देशात 2020 मध्ये भारत-सौदी अरेबियामधील व्यावसायिक संबंध भागीदारीच्या पातळीवर पोहोचले होते. सौदी अरेबीयामध्ये मोठ्या प्रमाणात भारतीय कामगार काम करत आहे. तसेच सौदी हा भारताचा पाचवा सर्वात मोठा व्यापारी देश आहे.