Sanjay Raut on Sharad Pawar : शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी शरद पवार (Sharad Pawar) यांच्यासोबत कोणताही रूसवा-फुगवा नसल्याचं स्पष्ट केलंय. मात्र राऊत यांनी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना महादजी शिंदे पुरस्कार देण्यात आला, यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय. सोबतच शरद पवार यांची मोठी फसवणूक झाली, असा आरोप देखील त्यांनी केलाय.
महादजी शिंदे यांच्या नावाने ज्या व्यक्तीला पुरस्कार दिला जातो, त्यांनी असं कुठलं महान कार्य केलं? असा सवाल राऊतांनी केलाय. तर महाराष्ट्र सदनामध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या बॅनरखाली हा कार्यक्रम घेण्यात आला. लोकांचा गैरसमज झाला की, मराठी साहित्य संमेलनाने हा पुरस्कार दिला. शरद पवार यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांची फसवणूक झाली. हा कार्यक्रम साहित्य संमेलनाचा नव्हता, खाजगी कार्यक्रम होता. आमच्याकडे अशा अनेक खाजगी संस्था पुरस्कार देत असतात. मराठी साहित्य परिषदेची परवानगी न घेता मराठी साहित्य संमेलनाच्या बॅनरखाली हा कार्यक्रम घेण्यात आला, असा आरोप संजय राऊत यांनी केलाय.
धक्कादायक! मिरवणुकीत मंत्री राणेंसोबत झळकले गँगस्टर बिश्नोईचे पोस्टर, अहिल्यानगरमध्ये खळबळ
संमेलनाचं नाव वापरून, गैरवापर करून हा पुरस्कार देण्यात आला. येथे आमचा आक्षेप आहे. संजय राऊत म्हणाले की, शरद पवार यांच्यासारख्या व्यक्तीला सुद्धा अंधारात ठेवलं गेलं. नाराजी व्यक्त करणं ही लोकशाही आहे. दोन स्वतंत्र विचारधारा आहेत. आमचं एखाद्या व्यक्तीविषयीचं मत टोकाचं आहे. शरद पवार यांचा पक्ष फोडणाऱ्या लोकांबद्दल सुद्धा आमचं तेच मत आहे. आमचा पक्ष आणि शरद पवारांचा पक्ष नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी फोडला, असं त्यांनी म्हटलंय.
शरद पवारांशी कशाबाबत चर्चा करावी? असा प्रश्न यावेळी उपस्थित करण्यात आलाय. आमचं आणि शरद पवार यांचे भांडण नाही, आम्ही आमचे मत मांडलं भूमिका मांडली. त्यांची भूमिका वेगळी असेल, आमची भूमिका मांडण्याचा आम्हाला अधिकार आहे तसा त्यांना सुद्धा आहे. सत्तेचा गैरवापर करून लोकांना दणका देऊन दिल्ली पुढे झुकणारे लोक आहेत. सरपटणारे लोक आहेत, त्यांना तुम्ही महादजी शिंदे पुरस्कार देता. तर त्या संस्थेची चौकशी व्हायला हवी, अशी मागणी राऊतांनी केलीय.
‘छावा’ पाहणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ‘या’ राज्यांत चित्रपट टॅक्स फ्री, CM मोहन यादव काय म्हणाले?
पुरस्कार देण्यासाठी महाराष्ट्र सदन वापरलं गेलं, त्यावरून शरद पवारांना असं वाटलं असेल की, कार्यक्रम साहित्य संमेलनाचा आहे. या राज्याची एकंदरीत फसवणूक करून शिंदेंना पुरस्कार दिला आहे. यामध्ये गडबड आहे, ती सगळ्यांना माहित आहे. ज्यांनी पुरस्कार दिला त्यांनी किंवा ज्यांच्या हस्ते पुरस्कार दिला त्यांनी महादजी शिंदे यांच्या तोडीचे काम एकनाथ शिंदे यांनी काय केलं? हे सांगायला हवं. यानंतर शरद पवार यांच्याशी माझं दहा वेळेस बोलणं झालं. मी पुरस्काराच्या नावाने तो खोटारडेपणा झाला तो मांडला, अशी भूमिका संजय राऊत यांनी स्पष्ट केलीय.
शिंदे यांचा बालेकिल्ला कुठलाच नाही. पैशांनी बालेकिल्ले घेतले. असं कोणतं महान कार्य एकनाथ शिंदे यांनी केलं? ते काय लोकमान्य टिळक आहेत? वल्लभभाई पटेल, दीनदयाळ उपाध्याय आहेत का? त्यांची अशी कुठली विचारधारा आहे, ज्यांनी बालेकिल्ले उभे झाले? ज्या दिवशी अमित शहा नसतील, त्या दिवशी बालेकिल्ले काय टेकड्या सुद्धा नसतील अशी टीका खासदार संजय राऊत यांनी केलीय.