धक्कादायक! मिरवणुकीत मंत्री राणेंसोबत झळकले गँगस्टर बिश्नोईचे पोस्टर, अहिल्यानगरमध्ये खळबळ

Gangster Bishnoi Poster With Minister Rane In Shiv Jayanti : देशात काल छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती (Shiv Jayanti) उत्साहात साजरी झाली. मात्र, याच दरम्यान अहिल्यानगर शहरात एक अत्यंत धक्कादायक प्रकार घडल्याचे समोर आलं आहे. अहिल्यानगरमध्ये (Ahilyanagar) काढण्यात आलेल्या एका शिवजयंती मिरवणुकीत एका संघटनेच्या कार्यकर्त्यांनी राजकीय नेत्यांसह चक्क कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई (Gangster Bishnoi) याचे पोस्टर झळकवले. विशेष गँगस्टर आणि त्याच्याच बाजूला भाजप नेते आणि मंत्री नितेश राणेंचाही फोटो होता.
‘गुगल पे’चा वापरकर्त्यांना मोठा दणका! ‘या’ पेमेंटवर सुविधा शुल्क भरावा लागणार
राज्यासह नगर शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांची 395 वी जयंती अत्यंत उत्साहात साजरी करण्यात आली. सकाळी शहरात मिरवणुकांचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर सायंकाळी शहरात डीजे सिस्टीम लावत मिरवणूक काढण्यात आली. शिवजयंती निमित्त शिवरायांचे पोस्टर झळकवण्यात आले असल्याचे आपण पाहिले. मात्,र यंदा नगरमध्ये चक्क गँगस्टर बिश्नोईचे पोस्टर घेऊन तरुण नाचताना दिसून आल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.
शिवजयंती मिरवणुकीत डीजेच्या तालावर नाचताना कार्यकर्त्यांनी स्वातंत्रवीर सावरकर, नथुराम गोडसे याच्यासह मंत्री नितेश राणे यांच्या बरोबर कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा फोटो असलेले पोस्टर्स झळकावले. बिश्नोईच्या फलकावर ‘आय एम ए हिंदू. एमॅड ए मॅड’ असं लिहिलं होतं. सार्वजनिक निवडणुकीमध्ये अशा प्रकारे गँगस्टरचे फोटो झळकवण्याचा उद्देश काय? असा सवाल विचारला जाऊ लागला आहे.
‘छावा’ पाहणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ‘या’ राज्यांत चित्रपट टॅक्स फ्री, CM मोहन यादव काय म्हणाले?
आम्ही गांधींला नाही, तर शिवाजी महाराज आणि महाराणा यांना मानणारे आहोत, असं या पोस्टवर लिहिलं गेलं आहे. गणेशोत्सवाच्या मिरवणुकीत होणारे वाद लक्षात घेऊन पोलिसांनी देखील फलक झकळावण्यास बंदी घातली होती. तरी देखील कुख्यात गँगस्टरचे फोटो झळकल्याने अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत. अहिल्यानगरमध्ये मात्र हा धक्कादायक प्रकार घडल्याचं समोर आलंय.