Shivjayanti निमित्त डाक कर्मचाऱ्यांचा अनोखा उपक्रम! रक्तदान करत महाराजांना अभिवादन
Shivjayanti : ज्यांचे नाव मराठी माणसाच्या हृदयात कायमस्वरूपी कोरलं गेलं आहे. ते महाराष्ट्राचे आराध्यदैवत श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज जयंती (Shivjayanti) उत्सव प्रधान डाकघर येथे प्रतिवर्षी प्रमाणे याही वर्षी साजरा करण्यात आला. सलग तिसऱ्या वर्षी टपाल कर्मचाऱ्यांने रक्तदान करत महाराजांना अभिवादन करण्यात आले.
Raj Thackeray : आरक्षण देण्याचा अधिकार मुळात राज्य सरकारला आहे का? राज ठाकरेंचा सवाल
कार्यक्रमाची सुरवात महाराजांच्या प्रतिमेचे पूजन व जिजाऊ वंदना बी नंदा प्रवर अधिक्षक डाकघर अहमदनगर हस्ते करण्यात आली. यावेळी परिसर घोषणेने दुमदुमून गेला. शिवजन्मोत्सव सोहळा 2024 उत्सवाच्या निमित्ताने विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आलेले होते. त्यामध्ये न्यू अर्पण ब्लड बँक यांचे वतीने आयोजित रक्तदान शिबीरामध्ये डाक कर्मचाऱ्याने स्वयंपूर्तीने सहभाग घेत रक्तदान केले. यामध्ये महिलांचा कर्मचाऱ्यांचा सहभाग निश्चितच लक्षणीय व कौतुकास्पद होता.
मराठा आरक्षणाविरोधात गुणरत्न सदावर्ते पुन्हा हायकोर्टात, नेमकं कारण काय?
यावेळी प्रवर अधिक्षक बी नंदा, सुरेशजी बन्सोडे, संदिप हदगल, अमित देशमुख, बाळासाहेब बनकर, संजय बोदर्डे, अरुण रोकडे, अश्विनी फुलकर यांची प्रमुख उपस्थिती होती. शिबिरात पोस्टल संघटनेचे नेते संतोष यादव, ऋषीकेश कार्ले, प्रदिप सूर्यवंशी, स्मिता कुलांगे, स्मिता साखरे, नितीन थोरवे, कमलेश मिरगणे, तान्हाजी सूर्यवंशी, देवेन शिंदे, राजू राहिंज, प्रितम वराडे, बापु तांबे, पनालाल डाडर, जय मडावी, दिपक कुंभारे, दिपक नागपुरे, अमोल साबळे,संदिप कोकाटे,सागर कलगुंडे, सागर जाधव यांनी सहभाग घेतला.न्यू अर्पण ब्लड बँकेचे भाग्यश्री पवार,श्रध्दा खरात, रिद्धी पवार,नेहा खंडाळकर यांनी शिबिराचे कामकाज पाहिले.
मराठा आरक्षणाविरोधात गुणरत्न सदावर्ते पुन्हा हायकोर्टात, नेमकं कारण काय?
सायंकाळी “जगदंबा पोवाडा संच” सादरकर्ते शाहीर आदिनाथ बडगे वाळूंज यांचा पोवाडाचा शानदार कार्यक्रम संपन्न झाला.
त्यानंतर महाराजांची मुर्तीपूजन व जिजाऊ वंदना झाली. कार्यक्रम यशस्वी करणेकरिता श्री सागर पंचारिया,बाबासाहेब शितोळे, राधाकिसन मोटे, निसार शेख,संतोष घुले, सुखदेव पालवे,संदीप मिसाळ,रामेश्वर ढाकणे,वंदना नगरकर,मोनाली हिंगे,अविनाश ओतारी, रवी रूपनर,बाळराजे वाळुंजकर,बळी जायभाय यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाची सांगता महाराजांची आरती व जिजाऊ वंदन गीत गाऊन करण्यात आली.