…तर मी माझे शब्द मागे घेतो, अखेर ‘त्या’ वक्तव्याबाबत आमदार गायकवाड यांची दिलगिरी!

Sanjay Gaikwad : शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांनी मराठी भाषा (Marathi language) आणि छत्रपती संभाजी महाराज (Chhatrapati Sambhaji Maharaj यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त विधानाबद्दल अखेर माफी मागितली आहे. गायकवाड यांनी केलेल्या वक्तव्यामुळे शिवभक्तांच्या आणि मराठी जनतेच्या भावना दुखावल्या गेल्या होत्या. अनेकांनी त्यांच्या वक्तव्यावर तीव्र नाराजी व्यक्त झाली होती. त्यानंतर आता गायकवाड यांनी दिलगिरी व्यक्त केली. विरोधकांनी माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला, असंही ते म्हणाले.
अंबानींचं मोठं पाऊल! चीनला दणका, भारत प्लास्टिकचे जागतिक केंद्र बनणार
….तर मी माझे शब्द मागे घेतो
मुंबईत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र आल्यानंतर त्यांच्यावर टीका करताना संजय गायकवाड यांची जीभ घसरली होती. मराठी भाषेच्या मुद्द्यावर बोलताना आणि ठाकरेंवर टीका करताना त्यांनी छत्रपती संभाजीराजे आणि शिवरायांबद्दलही अपशब्द वापरले होते. त्यानंतर आज माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, विरोधकांनी माझ्या शब्दांच्या अर्थांचा अनर्थ केला, मी शिवभक्त असून माझं शिवप्रेम संपूर्ण जगाला माहिती आहे. मात्र, माझ्या वक्तव्यचाचा विपर्यास करण्यात आला. त्यामुळे शिवभक्तांच्या भावना दुखावली असेल तर मी माझे शब्द मागे घेत आहे आणि दिलगिरी व्यक्त करत आहे, असं गायकवाड म्हणाले.
संजय गायकवाड काय म्हणाले होते?
गायकवाड म्हणाले की, तुम्हाला जगात टिकायचं असेल तर सगळ्य भाषा शिकल्या पाहिजेत. छत्रपत संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, मग ते काय मूर्ख होते का? छत्रपती शिवाजी महाराज, तारा राणी, येसूबाई या सर्वांनीच हिंदीसह अनेक भाषा शिकल्या, ते लोक काय मूर्ख होते का? भाषेवरून असे वाद निर्माण करणे, मतांचं राजकारण करणं चुकीचं आहे, असं गायकवाड म्हणाले होते.
संजय गायकवाड यांच्या विधानानंतर डोंबिवलीत मनसे आक्रमक झाली होती. डोंबिवली पूर्वेतील इंदिरा चौकात मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी संजय गायकवाड यांच्या विरोधात आंदोलनं केली. यावेळी गायकवाड यांच्या प्रतिकात्मक फोटोला गाढवाचे तोंड लावून चपलेने मारत जोडे मारो आंदोलन केलं होतं. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गायकवाड यांच्या विधानावर नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर आता गायकवाड यांनी माफी मागितली आहे.