Raosaheb Danve On Sanjay Raut : मराठा आरक्षणाच्या (Maratha reservation) मागणीसाठी जालन्यातील अंतरवली सराटी गावात मनोज जरांगे (Manoj Jarange) उपोषणाला बसले होते. अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत मराठा समाजाला आरक्षण देण्याचं मान्य केलं. त्यानंतर मनोज जरांगे यांनी आपले उपोषण संपवले. मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे, अशी मागणी मनोज जरांगे यांनी केली आहे. दरम्यान, ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आज राज्य सरकारसह केंद्रावर जोरदार हल्लाबोल केला होता. त्याला आता केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
संजय राऊतांनी आज पत्रकार परिषदेत बोलतांना मराठा आरक्षण आणि मनोज जरांगे पाटील यांच्यावरूही सरकारवर गंभीर आरोप केले होते. त्यांनंतर आज माध्यमांशी बोलतांना दानवेंना राऊतांनी केलेल्या टीकेविषयी विचारले असता त्यांनी राऊतांवर सडकून टीका केली. ते म्हणाले, मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी बेमुदत उपोषण पुकारले, त्यानंतर राज्यातील अनेक नेत्यांनी त्यांची भेट घेतली. भाजपच्या नेत्यानेही त्यांची भेट घेऊन मराठा आरक्षणावर तोडगा काढण्याचे आश्वासन दिले होते. म्हणून आम्ही उपोषणास्थळी गेलो. जरांगेंना भेटलो. त्यावेळी गिरीश महाजन हे देखील माझ्या सोबत होते. आम्ही जरागेंना भेटलो तेव्हा संजय राऊत तर रात्रीचे दरवाजा बंद करून झोपले होते, अशी टीका दानवेंनी केली.
Delhi : विशेष अधिवेशनापूर्वी दिल्लीत मोठ्या घडामोडी; केसीआर यांचे थेट PM मोदींना पत्र
दावने म्हणाले, आम्ही त्यांच्या मागण्या मान्य केल्या. त्यांना जी आश्वासने दिली होती, त्या दिशेने आम्ही आता वाटचाल करत आहोत. यांनी तर तिथं तोंडही दाखवलं नाही आणि आता आमच्यावर टीका करतात. हे फक्त पिंजऱ्याते पोपट असून मालक आली की ते फक्त टिव टिव करत राहतात. उद्धव ठाकरे आल्या शिवाय हे काही बोलत नाही, असा खोचक टोला दानवेंनी लगावला. मात्र, पिंजऱ्यातील पोपट काय बोलतो याच्याशी आम्हाला काही देणंघेणं नाही, अशी टीकाही दानवेंनी केली होती.
दरम्यान, रावसाहेब दानवेंनी केलेल्या टीकेला आता संजय राऊत काय प्रत्युत्तर देतात हेच पाहणं महत्वाचं आहे.