Sanjay Raut : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी अखिल भारतीय नाट्य संमेलनाच्या कार्यक्रमात बोलताना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर जोरदार टीका केली. मुख्यमंत्र्यांच्या गळ्याला पट्टा दिसला की सिंहासन सिनेमा आठवतो, पण आताच्या मुख्यमंत्र्यांच्या गळ्यात तसा पट्टा नाही. आता मी कोणाबद्दल बोलतोय, हे तुम्हाला समजलं असेलच, असा टोला फडणवीस यांनी ठाकरेंचं नाव न घेता लगावला. यावर आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांना (Sanjay Raut) प्रत्युत्तर दिलं.
Aishwarya Rai: घर सोडलं, घटस्फोट घेतला… अभिनेत्रीनं अखेर दिला चर्चांना पूर्ण विराम
आज माध्यमांशी बोलतांना संजय राऊतांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. यावेळी त्यांनी फडणवीसांनी केलेल्या टीकेविषयी विचारले असता राऊत म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांना बोलू द्या. 2024 नंतर त्यांना नाटकं, एकांकिका हेच करायचं आहे. दुसरं काम काय आहे त्यांना ? मानेचा पट्टा एक आजार असतो. असे आजार अनेकांना होत असतात. अमित शाहाही आजारी असतात. मोदीही आजारी पडू शकतात. पण त्या मानेच्या पट्ट्यापेक्षाही त्यांच्या गळ्यातला दिल्लीच्या गुलामीचा पट्टा महाराष्ट्राला वेदना देणारा आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या गळ्यात पट्टा घातलेला आहे आणि दिल्ली तो पट्टा खेळवत बसली आहे, असं राऊत म्हणाले.
Raid 2: ना खाली हाथ आये थे, ना खाली हात जाएंगे; अजय देवगणच्या ‘रेड 2’ च्या शूटिंगला सुरुवात
शिवेसना आमदार अपात्रतेचा निर्णय 10 जानेवारीला लागणार असून हा निकाल शिंदे गटाच्या बाजूने लागणार असल्याचं बोललं जात आहे आणि यावरही संजय राऊतांनी भाष्य केलं. यावेळी त्यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि मुख्यमंत्री यांच्यात नुकत्याच झालेल्या भेटीवर जोरदार टीका केली. ते म्हणाल, ज्या न्यामूर्तींवर न्याय देण्याची जबाबदार सुप्रीम कोर्टाने सोपावली, तो न्यायपूर्ती उठतो, गाडीत बसतो आणि आरोपीच्या घरी जातो. चहापान करून हसत हसत बाहेर पडतो… न्याय देणारा न्यायमूर्तीच आरोपीला जाऊन बंद दाराआड भेटत असेल तर न्याय मिळणार कसा? असा सवाल राऊतांनी केला.
ते म्हणाले, देशाची न्याय व्यवस्था अत्यंत नाजूक टप्यावर पोहोचली. नार्वेकर आजारी पडले, आता ते अचानक बरे झाले, आणि त्यानंतर तातडीनं मुख्यमंत्र्यांना भेटले. म्हणजे न्याय देणारे न्यायालयाचे न्यायाधीश बंद दारात जाऊन आरोपींना भेटून चर्चा करतात. ही आपली न्यायव्यवस्था आहे, त्यामुळं राज्यघटना धोक्यात आल्याचं राऊत म्हणाले.