Download App

जेलमध्ये जायची वेळ येऊ म्हणून शिंदे रडले, भीतीने पक्ष सोडून पळाले; राऊतांचा गौप्यस्फोट

  • Written By: Last Updated:

Sanjay Raut on CM Eknath Shinde : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना तुरुंगात टाकण्याचा भाजपचा (BJP) डाव होता. जेलमध्ये जाण्याची वेळ येऊ म्हणून शिंदे कुठे-कुठे जाऊन रडले, त्यांनाचा विचार असा गौप्यस्फोट ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी (Sanjay Raut) केला.

पवार कुटुंब पुन्हा एकत्र येण्याबद्दल अजित पवारांच मोठ विधान! म्हणाले, फक्त ही निवडणूक… 

आज संजय राऊतांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. महाविकास आघाडीने आशिष शेलार, गिरीश महाजन, देवेंद्र फडणवीसयांना अटक करण्याचं कारस्थान रचलं होतं, असं आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना केला. त्याविषयी राऊतांना विचारले असता म्हणाले, त्या सरकारमध्ये स्वतः एकनाथ शिंदे होते, एकनाथ शिंदे हे तुरुंगाला घाबरून पळाले. ईडी आणि सीबीआय मागे लावून भारतीय जनता पक्ष एकनाथ शिंदे यांना तुरुंगात टाकणार होता. तुरुंगात जायचे नाही म्हणून एकनाथ शिंदे कुठे कुठे जाऊन रडले, त्यांनाच विचारा ना. शिंदे तुरुंगाला घाबरून पळाले, असं राऊत म्हणाले.

प्रेक्षकांना भावला सखी गोखलेचा गोड अंदाज; पाहा फोटो 

ते म्हणाले, भाजपमध्ये एक तर भ्रष्टाचाऱ्यांना स्थान आहे किंवा खोटं बोलणाऱ्यांना जागा आहे. जेव्हा एखादी व्यक्ती भाजपमध्ये जाते, तेव्हा त्याला खोटं बोलण्याचं ट्रेनिंग दिलं जात, अजित पवार, एकनाथ शिंदे हे सर्व अगदी रेटून खोटं बोलत आहेत. त्यामुळं आता त्यांची जेलवारी टळली असेल पण उद्या टळणार नाही, असा इशाराही राऊतांनी दिला आहे.

यावेळी राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवरही टीका केली आहे. ते म्हणाले, मोदी आता देशाचे पंतप्रधान राहिलेले नाहीत. ते भाजपचे नेते झाले आहेत. आचारसंहिता लागू झाल्यानंतर कोणीही देशाचा पंतप्रधान नसतो. मोदी आपल्या भाषणात राष्ट्रीय मुद्द्यांवर भाष्य करत नाहीत. मोदींना मुस्लिमांबाबत केलेल्या वक्तव्यावरून मोदींना पराभवाची भीती वाटत आहे, असं राऊत म्हणाले.

बकवास हिंदुत्ववादी सरकार
दिल्लीतील निर्वाचन आयोगाचं नाव बदलून भाजप निवनिर्वाचन आयोग करावं, महाराष्ट्रात जय भवानी किंवा हर हर महादेव ह्या घोषणा पिढ्यानपिढ्या दिल्या जातात. आजवर कोणीही त्यावर बंदी घातली नव्हती, अगदी काँग्रेसच्या राज्यातही असे कधी झाले नव्हते. तुमचं नमो-ढमो चालंत, पण, हिंदू धर्मातील एक शब्दही चालत नाही, हे बकवास हिंदुत्ववादी सरकार आहे, अशी टीका राऊतांनी केली.

follow us

वेब स्टोरीज