Download App

Sanjay Maharashtra Politics : बावनकुळेंना कोणी अधिकार दिले?; जागावाटपाच्या वादात शिंदे गटाची उडी

शिवसेनेचे छत्रपती संभाजीनगरचे आमदार संजय शिरसाट यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंवर निशाणा साधला आहे. बावनकुळे यांनी आम्ही 2024च्या विधानसभा निवडणुकीत 240 जागा लढवणार असे विधान केले होते. तर शिंदे गट फक्त 40 जागांवर निवडणुका लढवेल, असे विधान केले होते. या त्यांच्या विधानवरुन शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी बावनकुळेंवर निशाणा साधला आहे.

बावनकुळेंच्या स्टेटमेंटमध्ये काही दम नाही. बावनकुळेंना एवढे कोणी अधिकार दिलेले नाहीत, असे म्हणत त्यांनी बावनकुळेंना सुनावले आहे. असे वक्तव्य केल्याने युतीमध्ये बेबनाव येतो याची जाणीव त्यांनी ठेवली पाहिजे, असे म्हणत शिरसाटांनी बावनकुळेंवर निशाणा साधला आहे. 48 जागा लढवणारे आम्ही मुर्ख आहोत का, असा सवाल शिरसाट यांनी उपस्थित केला आहे.

‘आम्ही मुंडे साहेबांचीच माणसं, त्यांच्या नावाने हॉस्पिटलही होईल आणि स्मारकही; मुख्यमंत्री शिंदेंची घोषणा..

याविषयीचा निर्णय वरिष्ठ ठरवतील. वरिष्ठांना हा निर्णय जाहीर करु द्या, तुम्हाला व मला याचे अधिकार कोणी दिले, अशा शब्दात शिरसाटांनी बावनकुळेंन सुनावले आहे. अशा वक्तव्यांमुळे पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये चलबिचल होते, असे शिरसाट म्हणाले आहेत.

दरम्यान, बावनकुळे यांनी आपल्या वक्तव्यावरुन घुमजाव केला आहे. आमच्या दोन्ही पक्षामध्ये कोणतेही जागावाटप झाले नसून अद्याप जागा वाटपाचा फॉर्म्युला अद्याप ठरलेला नाही, असे बावनकुळे म्हणाले आहेत. निवडणुकीत 240 जागा लढवण्याचे वक्तव्य मी कार्यकर्त्यांना उर्जा देण्यासाठी व निवडणुकीसाठी सज्ज राहण्यासाठी केले, असे ते म्हणाले आहेत.

Nana Patole ; अमृता आमची सुनबाई, देवेंद्र लहान भाऊ पण गृहमंत्री म्हणून…

बावनकुळेंच्या वक्तव्यावरुन ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी देखील शिंदे गटावर टीका केली आहे. आता त्यांच्यासमोर 40-45 जागांचे तुकडे फेकले जात आहेत. पुढेही त्यांच्यासमोर तुकडेच फेकले जातील. शिंदे गटाला आयुष्यभर तोंडात तुकडे घेऊनच जगावे लागेल, अशा शब्दात राऊतांनी शिंदे गटावर निशाणा साधला आहे.

Tags

follow us