Download App

मग पोलीस यंत्रणा काय काम करतेय? वाल्मिक कराडच्या सरेंडरनंतर संतोष देशमुखांच्या मुलीची पहिली प्रतिक्रिया

Walmik Karad: बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण संपूर्ण राज्यात गाजत असताना आता या प्रकरणात एक मोठी बातमी समोर

  • Written By: Last Updated:

Valmik Karad : बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण (Santosh Deshmukh Murder Case) संपूर्ण राज्यात गाजत असताना आता या प्रकरणात एक मोठी बातमी समोर आली आहे. या प्रकरणात संशयित आरोपी वाल्मिक कराड (Valmik Karad) सीआयडीसमोर (CID) आज शरण आला आहे. मागील दोन – तीन दिवसांपासून वाल्मिक कराड सीआयडीसमोर शरण येणार असल्याची चर्चा सुरु होती.

माहितीनुसार, आज सकाळी 12 वाजता वाल्मिक कराड पुण्यातील सीआयडी कार्यालयात शरण आला. मात्र त्यापूर्वी त्याने सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत आपला या प्रकरणात कोणताही संबंध नाही आणि जर पोलीस चौकशीत माझ्यावर आरोप सिद्ध झाला तर न्यायालय जी शिक्षा देणार ती मान्य असेल असं त्याने व्हिडिओमध्ये म्हटले आहे.

तर दुसरीकडे वाल्मिक कराड सीआयडीसमोर शरण आल्यानंतर संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी देशमुखची (Vaibhavi Deshmukh) पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. वैभवी देशमुख यांनी या प्रकरणात प्रतिक्रिया देत गुन्हेगार स्वत: सरेंडर होत असेल, मग पोलीस यंत्रणा काय काम करतेय का? असा प्रश्न उपस्थित केला आहे.

या प्रकरणात प्रतिक्रिया देताना त्यांच्या मुलीने सांगितले की, जर आरोपीला अटक करण्यास ऐवढा वेळ लागत असेल तर आम्ही न्यायाची अपेक्षा कधी करायची. आम्हाला न्याय कधी मिळणार? माझी एकच मागणी आहे सीडीआरनुसार जे आरोपी आहेत ज्यांनी माझ्या वडिलांची क्रूर हत्या केली आहे ते तीन आरोपी फरार आहे त्यांना लवकरात लवकर अटक करण्यात यावी अशी प्रतिक्रिया वैभवी देशमुख यांनी दिली.

आधी व्हिडीओ बनवला, मग शरण गेला… वाल्मिक कराडच्या सरेंडरची स्टोरी

पुढे बोलताना संतोष देशमुखांच्या मुलीने सांगितले की, आम्हाला लवकरात लवकर न्याय मिळाला पाहिजे हीच मागणी आहे. पोलिस यंत्रणा काम करतेय मग इतका वेळ का लागतोय? गुन्हेगार स्वत: सरेंडर होत असेल, मग पोलीस यंत्रणा काय काम करतेय का? असा प्रश्न देखील त्यांनी यावेळी उपस्थित केला.

गुन्हेगारी घटनांनी गाजलेल्या बीडचा पालकमंत्री कोण? ‘या’ नेत्याला मिळणार जबाबदारी

follow us