Download App

मुंडे बालाजी तांदळेवर भडकले होते; दमानियांनी थेट नावं घेत केले गंभीर आरोप

Anjali Damania On Dhananjay Munde : राज्यात संतोष देशमुख हत्याकांडामुळे संतापाची लाट पसरली आहे. आरोपींना फाशीची शिक्षा द्या अशी मागणी करण्यात

  • Written By: Last Updated:

Anjali Damania On Dhananjay Munde : राज्यात संतोष देशमुख हत्याकांडामुळे (Santosh Deshmukh Murder Case) संतापाची लाट पसरली आहे. आरोपींना फाशीची शिक्षा द्या अशी मागणी करण्यात येत आहे. या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड (Walmik Karad) यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आल्याने धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीमाना दिला आहे.  तर दुसरीकडे आता धनंजय मुंडे यांना देखील संतोष देशमुख हत्या प्रकरणात सहआरोपी करा अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी केली आहे.

पत्रकार परिषदेमध्ये बोलताना त्यांनी धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप करत संतोष देशमुख हत्या प्रकरणात त्यांना सहआरोपी करा अशी मागणी केली आहे. या पत्रकार परिषदेमध्ये अंजली दमानिया म्हणाल्या की, बालाजी तांदळे यांना सांगण्यात आलं होतं की, 9 तारखेपासून तांदळे हा पोलिसांबरोबर फिरत होता. हे प्रकरण शेकायला लागलं, तेव्हा तो आरोप कराड किंवा यांच्यापर्यंत पोहोचू नये, यासाठी या लोकांना अटक करुन तिथल्या तिथे निपटवा. यासाठी धनंजय मुंडे प्रयत्न करत होते असा आरोप त्यांनी या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना केला. तसेच हे जे लेटर आहे, पोलीस खात्याने बालाजी तांदळेला 15 तारखेच लिहिलेल पत्र आहे. 9 तारखेपासून बालाजी तांदळे पोलिसांसोबत फिरत होते. लेटर दिलं 15 तारखेला. कुठच पोलीस स्टेशन आरोपीच्या मित्राला लेटर देऊन सांगत, तू तुझी गाडी घेऊन आपण शोध घेऊ असा प्रश्न देखील त्यांनी विचारला. याच बरोबर धनंजय मुंडे यांचा दबाव होता, पोलिसांवर दबाव होता असा दावा देखील त्यांनी यावेळी केला.

या प्रकरणात पुढे बोलताना अंजली दामनिया म्हणाल्या की, बालाजी तांदळेने देशमुख कुटुंबाला सांगितलेली माहिती अशी आहे की, पोलिसांनी आरोपी शोधलेले नाहीत. आम्ही गाड्या फिरवून आरोपींचा शोध घेतला, सगळं प्रकरण त्यांच्यावर शेकलं, जावं यांच्यापर्यंत येऊ नये. माझी पहिली मागणी आहे की, सगळ्यांना सहआरोपी कर. आरोपपत्र अनेक गोष्टी आलेल्या नाहीत. असं देखील या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना अंजली दमानिया म्हणाल्या. तसेच जे पोलिस अधिकारी आहे, ज्यांनी प्रचंड मदत केली, त्यांचं कोणाचही नाव त्यामध्ये नाही. कोणाचही स्टेटमेंट चार्जशीटमध्ये नाही, माझ्याकडे 200 लोकांची यादी आहे. राजेश पाटील, महाजन, गीते म्हणून अधिकारी होते, जे खंडणीच्या दिवशी उपस्थित होते, त्यांचं कोणाचही स्टेटमेंट, नाव यामध्ये नाही. गीतेनी या टोळीला मदत केली होती. त्यांना पूर्ण कल्पना होती, संतोष देशमुख यांना उचलून नेलय, तरी सुद्धा मदत केली. हे सगळे सहआरोपी झाले पाहिजेत. तसेच माझी मागणी आहे की, धनंजय मुंडे , सारंग आंधळे, एसपी बारगळ, पीएसआय राजेश पाटील, पीआय महाजन, पीआय भागवत शेलार, बालाजी तांदळे, डॉ. वायबसे आणि गीते अशा दहा जणांना सहआरोपी करा. असं या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना अंजली दमानिया यांनी मागणी केली. तसेच धनंजय मुंडे हे बालाजी तांदळेला म्हणाले की, तू जास्त बोलला म्हणून मला त्रास होतोय. धनंजय मुंडे यांना सगळ्याची कल्पना होती, असे अंजली दमानिया यांनी म्हटले.

‘इन्स्टिट्यूट ऑफ पावटॉलॉजी’चा धमाल टिझर प्रेक्षकांच्या भेटीला, ‘या’ दिवशी चित्रपट होणार प्रदर्शित

मुख्यमंत्री धनंजय मुंडे यांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहे का?

याचबरोबर या संपूर्ण प्रकरणात मुख्यमंत्री धनंजय मुंडे यांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहे का? धनंजय मुंडे यांना सगळी कल्पना होती, अवादा कंपनीची बैठक सातपुडा बंगल्यात झाली होती, तिथे हे सगळे हजर होते. दोन पोलीस अधिकारी होते. ही सगळी माहिती आहे. पण चार्जशीटमध्ये त्याचा उल्लेख नाही. असं देखील यावेळी अंजली दमानिया म्हणाल्या.

follow us