Download App

देशमुखांच्या हत्येची प्लॅनिंग तिरंगा हॉटेलमध्येच, गोपनीय साक्षीदाराने कराडचा प्लॅन उघडला

Santosh Deshmukh Case : गेल्या दोन महिन्यांपासून राज्यात सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण (Sarpanch Santosh Deshmukh Murder Case) गाजत आहे.

  • Written By: Last Updated:

Santosh Deshmukh Case : गेल्या दोन महिन्यांपासून राज्यात सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण (Sarpanch Santosh Deshmukh Murder Case) गाजत आहे. या प्रकरणात आता देखील एक आरोपी फरार आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराडला (Walmik Karad) या प्रकरणात क्रमांक एकचा आरोपी करण्यात आला आहे. तर सोशल मीडियावर संतोष देशमुख हत्या प्रकरणातील काही फोटो व्हायरल झाल्यानंतर धनंजय मुंडे यांना देखील मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला आहे.

सध्या या प्रकरणात दररोज काहींना काही खुलासे होत आहे. तर आता या प्रकरणात आणखी एक मोठी माहिती समोर आली आहे. या माहितीनुसार, संतोष देखमुख हत्या प्रकरणात 5 गोपनिय साक्षीदारांचे जबाब महत्वाचे ठरले आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून बीड जिल्ह्यात सुरु असणारी कराड, चाटे, घुले टोळीच्या दहशतीबाबत महत्वाची माहिती देखील गोपनिय साक्षीदारांच्या जबाबातून समोर आली आहे. सुरक्षेच्या कारणामुळे पोलिसांनी साक्षीदारांची नावे गोपनीय ठेवली आहे. या प्रकरणातील पहिला साक्षीदार जेव्हा आरोपी तिंरगा हॉटेलमध्ये संतोष देशमुख यांच्या हत्येचा कट रचत होते तेव्हा उपस्थित होता. या साक्षीदाराने आरोपींमध्ये नेमके काय संभाषण झाले, हे पोलिसांना सांगितले आहे. तिंरगा हॉटेलमध्येच विष्णू चाटे आणि सुदर्शन घुलेची भेट झाली होती आणि तिथेच हत्येचा कट रचला गेला होता. अशी माहिती साक्षीदाराने दिली आहे.

महादेव मुंडे प्रकरणातही कराड कनेक्शन ?

तर दुसरीकडे परळीतील व्यापारी महादेव मुंडे खून प्रकरणात देखील आता वाल्मिक कराडच्या निकटवर्तीयाची कसून चौकशी करण्यात येत आहे. पोलिसांनी वाल्मिक कराडचा निकटवर्तीय श्रीकृष्ण कराड याची दीड तास चौकशी केली आहे. श्रीकृष्ण कराड परळी नगर परिषदेचे माजी पाणीपुरवठा सभापती आहे.

महादेव मुंडे यांचा खून प्लॉटिंगच्या व्यवहारातून झाल्याचा संशय त्यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी व्यक्त केला होता. त्यामुळे आता या प्रकरणात श्रीकृष्ण कराडचा काही संबंध आहे का? हे तपासले जात आहे. तर दुसरीकडे त्याची पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी स्थापन केलेल्या पथकाने ही चौकशी केली असल्याची माहिती समोर येत आहे.

अमेरिकेत पाकिस्तानीना नो एन्ट्री? पाकिस्तानातही अफगाणी लोकांना अल्टिमेटम; काय घडलं?

त्यामुळे या प्रकरणात देखील लवकरच मोठा खुलासा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. माहितीनुसार, पोलिसांनी आतापर्यंत महादेव मुंडे हत्या प्रकरणात 15 मुख्य संशयीतांची चौकशी केली आहे.

follow us