बावनकुळेंची भेट अन् पक्षांतराच्या चर्चा, जयंत पाटील म्हणाले, “मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात..”

बावनकुळेंची भेट अन् पक्षांतराच्या चर्चा, जयंत पाटील म्हणाले, “मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात..”

Jayant Patil on Maharashtra Politics : शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील भाजपात प्रवेश करणार अशा चर्चा सुरू आहेत. याला कारण म्हणजे जयंत पाटलांनी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घेतलेली भेट. तसेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची एका कार्यक्रमाला हजेरी. या घडामोडी घडल्या आणि जयंत पाटलांच्या पक्षांतराची चर्चा सुरू झाली. परंतु, जयंत पाटील यांच्या मनात नेमकं काय चाललं आहे याचा अंदाज त्यांच्या वक्तव्यातून येऊ लागला आहे. जयंत पाटील यांनी नुकतीच एका मराठी वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी राष्ट्रवादी सोडणार का या प्रश्नाचं थेट उत्तर देणं टाळलं. लोकांनाही वाटेल की या बातम्या खऱ्या नाहीत असे जयंत पाटील म्हणाले आहेत. 

जयंत पाटील नीच अन् कपटी माणूस, टप्प्यात आणून कार्यक्रम.. भाजप नेत्याची जहरी टीका

तुम्ही खरंच पक्ष सोडणार का या प्रश्नाचं उत्तर देताना पाटील म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना ज्यावेळी झाली तेव्हापासून मी या पक्षात काम करतोय. रोज उठून नाही नाही म्हणणं हे काही बरं नाही. यावर मी काही भाष्य करणार नाही. जयंत पाटलांबाबत जे दाखवलं जात आहे ते चुकीचं आहे असे ज्यावेळी लोकांना वाटू लागेल ने बोलता अशा ज्या बातम्या तयार करतात तेव्हा बातम्या तयार करण्याची आणि त्यांच्या बातम्यांकडे पाहणाऱ्यांचा दृष्टीकोनही बदलेल. लोकांनाही वाटेल की यात काही तथ्य नाही.

पवार साहेब दिल्लीत असतात. अनेकांच्या भेटीगाठी घेतात. पण तुमच्याच मित्रपक्षाला याचं दुखणं आहे थेट टीका करतात यावर पाटील म्हणाले, मीटिंगमध्ये काय होतं याबाबतीत मित्रपक्षांकडून टीका झाली आहे. भेटीबद्दल नाही. कार्यक्रमात ज्या गोष्टी घडल्या त्याबाबत संजय राऊतांनी आक्षेप घेतले होते. त्यांचं व्यक्तिगत मत त्यांनी व्यक्त केलं होतं. असे प्रसंग होत असतात. आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांनी जी टीका केली त्यावर पवार साहेबांनी उत्तर दिलं आहे. त्यामुळे या विषयावर अधिक बोलणे योग्य नाही असे जयंत पाटील म्हणाले.

मविआची घडी बसेल यावर लोकांना विश्वास नाही

विधानसभेचं अधिवेशन सुरू असताना आम्ही एकत्रित भेटलेलोच नाही. आधी विधानसभेत बाळासाहेब थोरात होते. ते काँग्रेसच्यावतीने पुढाकार घेत होते. शिवसेनेकडेही काही प्रमुख नेते होते. पण आता बरीचशी पडझड झाली आहे. आता विधानसभेत जे लोक आलेत त्यांना विधानसभेचा फारसा अनुभव नाही. त्यामुळे ते हळूहळू एकत्रित येण्यास सुरुवात होईल. विधानसभा निवडणुकीत दारुण पराभव झाला म्हटल्यानंतर महाविकास आघाडीची घडी पुन्हा बसेल यावर लोक आताच विश्वास ठेवणार नाहीत. कालपरत्वे परिस्थिती आणि लोकांची मतं बदलत असतात.

डेटा द्या 8 दिवसात प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देतो.. जयंत पाटील कार्यकर्त्यांवर भडकले

माझा निर्णय शरद पवारच करतील

मला प्रदेशाध्यक्ष पदावर काम करून बरीच वर्ष झाली आहेत. या पदाबाबतचा निर्णय घेणे हा पक्षांतर्गत प्रश्न आहे. हा मुद्दा मीडियात सांगण्याचा नाही. काही लोकांनी पक्षाच्या बैठकीत मतं मांडली ते ठीक आहे. ती मतं मी स्वीकारलीही पण त्यावर काही लोकांनी बाहेर जाऊन मत प्रदर्शन केलं. पण ते आक्षेपार्ह होते. माझ्याच बद्दल मतं व्यक्त केली असल्याने याबाबतीत आता पवार साहेबांनी निर्णय घ्यायचा आहे. मला जे काही सांगायचं आहे ते मी पवार साहेबांना सांगेन. सर्वांना विश्वासात घेऊन पवार साहेब योग्य तो निर्णय घेतील असे जयंत पाटील म्हणाले.

बावनकुळेंना मध्यरात्री भेटलोच नाही

जयंत पाटील म्हणाले, माझे सगळ्यांशी चांगले संबंध आहेत. व्यक्तिगत जीवनात सगळ्यांशी संबंध चांगले ठेवणे चुकीचे आहे असे मला वाटत नाही. याबाबत वेगळे अर्थ काढणे मला योग्य वाटत नाही. गडकरी आमच्या कार्यक्रमासाठी आले म्हणजे मी लगेच भाजपात चाललो असा त्याचा अर्थ होत नाही. बाहेर जरी चर्चा सुरू आहे म्हणजे विनाकारण निष्कर्ष काढणे चुकीचे आहे.

मी मध्यरात्री बावनकुळेंना भेटलोच नाही. कशासाठी त्यांना मध्यरात्री भेटायचं. सकाळी सहा वाजता वेळ दिली होती. या वेळेत मी त्यांची वाट पाहत थांबलो होतो. तिथेच काही लोक मला भेटायला आली तिथेच मी त्यांच्याबरोबर कॉफी घेत होतो. आधी मंत्रालयात भेट ठरली होती. नंतर त्यांनी विनंती केली की घरी या. मी म्हटलं ठीक आहे. मी त्यांच्या घरी गेलो तिथे राधाकृष्ण विखे पाटीलही होते. माझ्या मतदारसंघांतल्या प्रश्नांवर आमची चर्चा झाली.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube