Download App

ज्या प्रवृत्तीविरोधात आमचा संघर्ष त्यांच्यासोबत आमचे सहकारी…; शरद पवारांचा हल्लाबोल

Sharad Pawar On Ajit Pawar : राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात (NCP)आमचे अनेक सहकारी ज्यांना हजारो कार्यकर्त्यांनी शक्ती दिली, पाठिंबा दिला. अपेक्षा होती की, हे संघटन त्यांनी महाराष्ट्रात(Maharashtra) मजबूत करावं, पण नुसताच मजबूत करण्याचा विचार नव्हता. आज देशामध्ये भाजपच्या माध्यमातून जाती-जातीमध्ये धर्मा-धर्मामध्ये एकप्रकारचं वेगळं वातावरण तयार करण्याचा प्रयत्न केला जातो. या सर्वांशी संघर्ष करुन सामाजिक ऐक्य आणि समता यासाठी प्रयत्न करणे ही अपेक्षा सर्व सहकाऱ्यांकडून आहे, असे आवाहन राष्ट्रवादीचे नेते कार्यकर्त्यांना केले आहे. यावेळी अजित पवार यांच्यावर शरद पवार यांनी जोरदार निशाणा साधला. ते साताऱ्यामध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते.(satara Sharad pawar criticize on ajit pawar ncp)

“साहेब म्हणतील ते धोरण!” अमोल कोल्हे पुन्हा शरद पवारांच्या गोटात दाखल

शरद पवार म्हणाले की, काही सहकाऱ्यांनी वेगळी भूमिका घेतली. ज्यांनी वेगळी भूमिका घेतली, त्यांनी महाराष्ट्रामध्ये कार्यकर्त्यांच्या पाठिंब्याने मोलाची कामगिरी केली, पण तेच लोक ज्या प्रवृत्तीशी आमचा संघर्ष आहे, त्यांच्यासोबत गेल्यामुळे नवीन पिढीचा कार्यकर्ता नामशेष होऊ नये म्हणून आपण आजपासून हा दौरा सुरु केला असल्याचे शरद पवार यांनी सांगितले.

दिग्गजांचं बंड, नवख्यांना हाताशी धरत पवारांचा शड्डू; NCPच्या नव्या फळीतील यंग ब्रिग्रेड चर्चेत…

जिल्ह्यामध्ये आल्यापासून पुण्यातून निघाल्यापासून कार्यकर्ते आणि त्यातल्या त्यात तरुण कार्यकर्ते स्वागताला उभे होते. हे चित्र सर्वत्र आहे. आम्ही लोकांनी कष्ट केले. दिशा दिली, कार्यक्रम दिला तर माझी खात्री आहे की, दोन-तीन महिण्यात प्रयत्नाने सबंध महाराष्ट्राचं चित्र राष्ट्रवादीला अनुकूल करण्याची भूमिका बजावता येईल असा आशावादही यावेळी शरद पवार यांनी व्यक्त केला.

Tags

follow us