Download App

Shahajibapu Patil : अजित पवार मविआत निराशेतून उपमुख्यमंत्री, आता ते युतीत आल्यानं मी आनंदी

  • Written By: Last Updated:

Shahajibapu Patil on ajit Pawar : बऱ्याच दिवसांपासून मंत्रिमंडळ विस्ताराची (Cabinet Expantion )चर्चा सुरू आहे. मात्र, अद्याप मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. NCP मध्ये बंड करून अजित पवारांसह नऊ आमदार सरकारमध्ये सहभागी झाले. त्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आणि पाठोपाठ खातेवापटंही झालं. मात्र शिंदे गटाचे आमदार मंत्रिपदासाठी वेटींगवर आहेत. शिवाय, अजित पवारांना अर्थखातं मिळाल्यान पुन्हा निधी वाटपावरून अन्याय होईल अशी भीती शिंदे गटाच्या आमदारांना आहे. दरम्यान, या सगळ्या पार्श्वभूमीवर आता शिंदे गटाचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी (ShahajiBapu Patil) भाष्य केलं. अजित पवार सत्तेत आल्यानं मी समाधानी असल्याचं त्यांनी सांगितलं. (ShahajiBapu Patil on ajit Pawar and ncp Ajit Pawar did not want to go with Congress and Shiv Sena)

आज शहाजी बापू पाटील यांनी आज एका वृत्तवाहिनीशी संवाद साधला. यावेळी अजित पवार गटाच्या प्रवेशासंदर्भात प्रश्न विचारताच पाटील म्हणाले, अजित पवारांच्या सरकारमधील प्रवेशबाबत मी व्यक्तिगत समाधानी आहे. अजित पवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या प्रवेशाने राज्याच्या राजकारणाच 25-30 वर्षाचा अनुभव असलेले, कॅबिनेटमंत्री, सहकारमंत्री, उपमुख्यमंत्रीपदाचा अनुभव असलेले नेते आमच्यासोबत आलेत. त्यांनी मंत्री म्हणून शपथ घेतली. त्यामुळं जनतेची काम आता भराभरा होतील. आतापर्यंत शिंदे-फडणवीसांना किती वेगाने धडाडीचे निर्णय घेतले, हे आपण पाहतोच आहोत. अजित पवाराही कष्टाळू आहेत, त्यांच्या कामाचा झपाटा मोठा आहे. त्यामुळं आता राज्याच्या कारभारात गतिमानता येईल असं पाटील म्हणाले.

Nitin Gadkari धमकी प्रकरणात मुख्य सुत्रधार दहशतवादी नागपूर पोलिसांच्या ताब्यात… 

ते म्हणाले, अजित पवार महाविकास आघाडीत अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री होते. पण ते नाराजीने झालेले होते. नाहीतर त्यांनी पहाटेचा शपथविधी घेतला नसता. मुळात त्यांना शिवसेना आणि कॉंग्रेस सोबत जायचंचं नव्हतं. पण शरद पवारांच्या आग्रहामुळं ते मविआत गेले. शेवटी ती आमच्यासोबत आलेच. अजित पवार गटाला अनेक खाते गेली. मात्र, शिंदे गटात नाराजी नाहीत. पन्नास आमदारांना सोबत घ्याचयं म्हणजे, त्यांनाही मंत्रिपद द्यावीच लागणार होती. अजित दादांच्या येण्यानं भाजप-सेना युती आता भाजप-शिंदे गट- अजित पवार गट- रिब्लिन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) अशी महायुती झाली. या महायुतीकडून आगामी निवडणूक एकत्र लढवल्या जाणार आहेत. विधानसभेला 225 च्या पुढे आमचे आमदार येतील. खासदाकरीला 48 जागा निवडणू येतील. सुप्रिया सुळेंची जागा निवडून आली तरच आमची एखादी जागा कमी होईल, असं पाटील म्हणाले.

महाविकास आघाडीत असतांना अजित पवारांनी निधी वाटपाबाबत अन्याय केला का? यावर बोलतांना पाटील म्हणाले, मी त्यावेळी अजित दादांवर बरीच टीका केली. मात्र, त्यांच्या अर्थखात्याने सांगोला मतदार संघावर अन्याय केला नाही. याआधी मी पवारांसोबत बराच काळ काम केलं. अजित पवारांचे आणि माझे चांगले संबंध आहेत. मात्र, गुवाहाटीत गेल्यावर अजित पवारानी आमच्यावर आमच्यावर निधी देतांना अन्याय केला, हे काही आमदारांच म्हणणं होतं. हे मी माध्यमांपुढं मांडलं. अजित पवारांनी त्यांच्या पक्षाच्या आमदारांना जास्त निधी दिला असेल, शेवटी राष्ट्रवादी त्यांचा पक्ष होता. मात्र, आता तीन्ही अजित पवारांचेच आहेत. या तिन्ही पक्षांना आणि पक्षाच्या आमदारांना सांभाळण्याची जबाबदारी शिंदे-फडणवीसासोबतच अजित पवारांवरही आहे. शिवसेनेतील बरेच आमदार हे अजित दादांचे मित्र आहेत. त्यामुळं आता निधी वाटपावरून अन्याय होणार नाही, असं पाटील म्हणाले.

Tags

follow us