Shalinitai Patil News : शिखर बॅंक घोटाळ्याप्रकरणी देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnvis) अजित पवार यांना वाचवलं तर जलसिंचन घोटाळ्यातून पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Narendra Modi) अजित पवारांना वाचवत असल्याचा गंभीर आरोप शालिनीताई पाटील (Shalinitai Patil News) यांनी केला आहे. पंतप्रधान मोदी यांनी अजित पवार यांना पक्षात घेऊन दोन्ही घोटाळ्या प्रकरणी संरक्षण दिलं असल्याचाही आरोप शालिनीताई पाटील यांनी केला आहे. शालिनीताई पाटील यांनी शरद पवारांसह उद्धव ठाकरे यांना याबाबत पत्र लिहले आहे.
भाजपने डोळे दाखवताच अजितदादा नरमले; चंद्रकांतदादांनी प्रस्तावित केलेली सर्व कामे मंजूर
शालिनीताई पाटील यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हणाल्या, पूर्वीच्या जनसंघ पक्ष आणि आत्ताच्या भाजपने अजित पवार यांना संरक्षण दिलं आहे. अजित पवार यांनी शिखर बॅंकेच्या 25 हजार कोटी रुपयांच्या घोटाळ्यातून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी वाचवलं आहे. तसेच जलसिंचन घोटाळ्यात अजित पवारांना पंतप्रधान मोदी वाचवत असल्याचं शालितीताई पाटील म्हणाल्या आहेत.
तसेच भाजप हा पूर्वीचा जनसंघ पक्ष आहे. नंतर जनसंघ पक्षाचं भारतीय जनता पक्ष असं झालं आहे. भाजप पक्षाला भारतीय नाव वापरण्याचा अधिकार कोणी दिला आहे. महाराष्ट्रातील नेत्यांना मी पक्ष लिहुन विनंती केली की भारतीय जनता पक्ष आणि अजित पवार यांच्याबाबत लढण्यासाठी सांगितलं आहे. त्यामुळे आता अजित पवार नाव पुढच्या काही दिवसात महाराष्ट्राच्या नकाशावरून गायब होणार असल्याचं भाकीतंही पाटील यांनी केलं आहे.
Kolhapur Loksabha : पाटील, मंडलिक, महाडिक की आणखी कोणी? पाहा व्हिडिओ
शरद पवारांच्या वयावर बोलण्याचा अधिकार कोणी दिला?
मागील काही दिवसांपासून अजित पवारांकडून शरद पवार यांच्या वयावरुन त्यांच्यावर टीका-टीप्पणी केल्याचं पाहायला मिळत आहे. त्यावरही शालिनीताई पाटील यांनी थेट भाष्य केलं आहे. अजित पवारांना शरद पवारांच्या वयावर बोलण्याचा अधिकार कोणी दिला? असे प्रश्न विचारण्याचा त्यांना अधिकार नाही. उद्या ते मी 92 वयाची असल्याने मला वेडं ठरवतील, असं पाटील म्हणाल्या आहेत.
कोणताच मुख्यमंत्री असा वागला नाही…
मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहुन भेटण्यासाठी वेळ मागितला, त्यांना विनंती केली पण एकनाथ शिंदे यांनी मला वेळ दिला नाही. याआधीच्या काळातील एकाही मुख्यमंत्र्यांनी असं कधी केलं नाही, असं वागलेले नाहीत. बाळासाहेब ठाकरेंनी माझा प्रश्न पाच दिवसांत सोडवला होता. त्यांच्या पक्षाचे हे मुख्यमंत्री असं वागत आहेत. आता मी त्यांंना कधीच भेटणार नसल्याचं शालिनीताई पाटील म्हणाल्या आहेत.