Shalini Patil : पुढील चार महिन्यात अजितदादा तुरुंगात असतील; शालिनीताईंचा थेट दावा

  • Written By: Published:
Shalini Patil : पुढील चार महिन्यात अजितदादा तुरुंगात असतील; शालिनीताईंचा थेट दावा

ShaliTai Patil On Ajit Pawar : पुढील चार महिन्यात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार तुरुंगात असतील असा थेट दावा  माजी मंत्री शालिनीताई पाटील (Shalini Patil) यांनी केला आहे. 2024 मध्ये लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका आहेत. मात्र, अजित पवार (Ajit Pawar) कुठूनही उभे राहू शकणार नाहीत. कारण त्यावेळी ते तुरूंगात असतील असा थेट दावा शालिनीताई पाटील यांनी केला आहे.

Video : कसब्यातून पुन्हा रासनेच, बळ अन् कौतुक करत बावनकुळेंनी दिले क्लिअर संकेत

फास्ट ट्रॅक कोर्टात प्रकरण चालवण्याची करणार विनंती

शालिनीताई म्हणाल्या की, आपण अजितदादांविरोधात एकूण तीन अर्ज दाखल करणार असून पुढील 10 दिवसात ते उच्च न्यायालयात दाखल केले जाणार आहेत. त्यानंतर पुढील 3 ते 4 महिन्यात अजितदादा तुरुंगाची हाव खात असतील. 5 वर्षे फुकट गेल्यामुळे हे प्रकरण फास्टट्रॅक कोर्टात घेण्याची विनंती आम्ही न्यायालयाला करणार असल्याचेही पाटील यांनी स्पष्ट केले.

विश्वासघात न करणारे फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार 

अजितदादा तुरूंगात जाण्याच्या दावा करणाऱ्या शालिनीताईंनी  फडणवीसांबाबत मोठा दावा केला आहे. त्या म्हणाल्या की, अजित पवार पुढील तीन ते चार महिन्यात तुरूंगात जातील. त्यानंतर पक्षाशी कधीही विश्वासघात न करणारे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपदी विराजमान होतील असा खळबळजनक दावाही पाटील यांनी केला आहे. त्यांच्या या दोन्ही दाव्यामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.

विखे पाटलांची ‘हॉटलाईन’ पुन्हा होणार अ‍ॅक्टिव्ह! दिल्लीत अमित शाहंसोबतची भेट फिक्स

अजित पवार घोटाळ्यातील मुख्य सूत्रधार

पुढे बोलताना शालिनीताई म्हणाल्या की, उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार अजित पवार शिखर बँकेच्या 25 हजार कोटींच्या घोटाळ्यातील मुख्य सुत्रधार आहेत. त्यामुळे राज्याच्या मुख्य सचिवांकडे अजितदादांविरोधात चार्जशीट दाखल करून त्यांना न्यायालयात हजर करण्याची मागणी करणार असल्याचे त्या म्हणाल्या. याशिवाय हा खटला फास्ट ट्रॅकवर चालवण्याची विनंतीदेखील आपण करणार असल्याचे शालिनीताईंनी यावेळी सांगितले.

मोदींवर विश्वास राहिला नाही

माझ्या संस्थेची मालमत्ता ईडीच्या ताब्यत आहे. त्यामुळे आता त्यांनी जप्त केलेली मालमत्ता आमच्या ताब्यात द्यावी आम्ही कारखाना चालवू असे म्हणत मालमत्ता परत देण्याची मागणी पाटील यांनी बोलताना केली आहे. ईडी ही संस्था केंद्राच्या अखत्यारित असल्याचे म्हणत आपला मोदींवर  विश्वास राहिलेला नाही.

शिंदे-फडणवीस सरकार व्यवस्थित चाललेलं असताना तुम्ही पक्ष फोडायची सुपारी देत अजितदादांना सोबत घेत त्यांना उपमुख्यमंत्री केलं असा थेट आरोप शालिनी पाटील यांनी भाजपवर केला आहे. त्यामुळे सुपारीचं हे राजकारण आम्हाला पसंत नाही. अजितदादांना तुम्ही उपमुख्यमंत्री केलं मात्र, ते काय योग्यतेचा व्यक्ती आहे याची कल्पना आपल्याला असल्याचे शालिनी पाटील यांनी म्हटले आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube