Video : कसब्यातून पुन्हा रासनेच, बळ अन् कौतुक करत बावनकुळेंनी दिले क्लिअर संकेत
पुणे : भाजपचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या कसबा मतदारसंघात पार पडलेल्या पोटनिवडणुकीत भाजपचे उमेदवार हेमंत रासनेंचा (Hemant Rasane) पराभव झाला होता. मात्र पराभवनंतर देखील हेमंत रासनेच भाजपचे उमेदवार असतील. पोटनिवडणुकीत हेमंत रासने यांचा पराभव काही मतांनी झाला. मात्र, पराभवाची चिंता न करता रासने जिद्दीने काम करत विजयाकडे वाटचाल करत असल्याची कौतुकाची थाप भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे. एवढेच नव्हे तर, येत्या काळात रासनेचं कसब्यातून उमेदवार असतील असे स्पष्ट संकेतदेखील त्यांनी दिले आहेत. ते कसब्यात आयोजित कार्यक्रमानंतर माध्यमांशी बोलत होते.
‘प्रेम विवाह अन् जोडप्यांना’ मिळणार पोलिसांचे कवच : “सैराट” रोखण्यासाठी गृहविभागाचा मोठा निर्णय
रासनेच असणार भाजपचे उमेदवार
कसब्यातील उमेदवारीबाबत बोलताना बावनकुळे म्हणाले की, येत्या काळामध्ये आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने रासने निश्चित यश मिळवतील. रासने हे अत्यंत कर्तव्यदक्ष, कर्तव्यनिष्ठ आणि प्रामाणिकपणे धर्मनिष्ठने काम करणारे असल्याचा विश्वास बावनकुळे यांनी व्यक्त केला.
विखे पाटलांची ‘हॉटलाईन’ पुन्हा होणार अॅक्टिव्ह! दिल्लीत अमित शाहंसोबतची भेट फिक्स
‘पक्ष नाही तर मी कमी पडलो’
कसब्यातील पराभवानंतर रासने यांनी प्रतिक्रिया देताना या निवडणुकीत पक्ष नव्हे तर, आपण स्वतः कमी पडल्याचे म्हणत या निकालावर आत्मपरीक्षण करणार असल्याचे रासने यांनी म्हटले होते. हा पराभव आपला असल्याचे सांगत थेट दुरंगी लढत झाल्याने भाजपला फटका बसल्याचेही त्यांनी त्यावेळी म्हटले होते. 2009, 2014 आणि 2019 मध्ये तिरंगी लढत झाली होती. त्यामुळे भाजपचा उमेदवार निवडून येणे सोपे होते. पण पहिल्यांदाच दुरंगी लढत झाल्याने त्याच फटका भाजपला बसल्याचे रासने यांनी कसब्याच्या निकालानंतर बोलताना सांगितले होते.
भाजपचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या कसबा मतदारसंघात पार पडलेल्या पोटनिवडणुकीत भाजपचे उमेदवार हेमंत रासनेंचा पराभव झाला होता. #Pune #BJP #chadrashekharbawankule pic.twitter.com/vk71bzTVmi
— LetsUpp Marathi (@LetsUppMarathi) December 26, 2023
जनतेला गृहीत घरून चालत नाही
दरम्यान, बावनकुळेंच्या कालच्या विधानाबाबत धंगेकर यांना विचारले असता ते म्हणाले की, बावनकुळेंनी केलेले विधान हा त्यांच्या पक्षाचा विषय आहे. मात्र, जनतेला गृहीत धरून चालणार नाही, जनताच सर्व ठरवत असते अशी प्रतिक्रिया धंगेकर यांनी दिली आहे.