Download App

ठाकरेंना खुश करण्यासाठी आरोप, हे बदनाम आम्हाला करण्याचं षडयंत्र; शिंदे गटाने सरोदेंचे आरोप फेटाळले

  • Written By: Last Updated:

Shambhuraj Desai : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) बंडखोर शिवसेना आमदारांसह गुवाहाटीला पोहोचले होते. या बंडामागील अनेक गोष्टी काही काळानंतर बाहेर आल्या. तर काही गोष्टी अजूनही गुलदस्त्यात आहेत. अशातच वकिल असीम सरोदेंनी (Asim Sarode) गुवाहाटीत घडलेल्या काही घटनांबाबत खळबळजनक आरोप केला. एकनाथ शिंदे यांच्यासोबत गुवाहाटीला गेलेल्या दोन आमदारांना मारहाण केली, तसेच आमदारांनी गुवाहाटी येथील हॉटेलमध्ये एअर होस्टेसचा विनयभंग करण्याचा प्रयत्न झाला, असा आरोप सरोदेंनी केला. त्यावर आता मंत्री शंभुराज देसाईंनी (Shambhuraj Desai) प्रतिक्रिया दिली.

Prerna Arora: निर्माती प्रेरणा अरोरा ‘डंक’ सिनेमाबद्दल म्हणाली, ‘भू-माफिया आणि…’ 

हे बदनाम करण्याचं षडयंत्र
आज शंभुराज देसाईंनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यानी अनेक विषयांवर भाष्य केलं. दरम्यान, यावेळी त्यांना असीम सरोदेंनी केलेल्या आरोपांविषयी विचारले असता देसाई म्हणाले की, सरोदेंना दोन वर्षानंतर जाग आली. त्यांना कदाचित रात्री स्वप्न पडलं असावं. सरोदे वकील आहेत ना, असं काही घडलं असेल तर आतापर्यंत ते काय झोपले होते का? असा सवाल देसाईंनी केला.

वंचित मविआत येणार की नाही? राऊत म्हणाले, आंबेडकर हे मायावतींसारखं…. 

ते म्हणाले, असं काहीच घडलंच नाही. केवळ आमची प्रतिमा मलिन करण्याचं आणि आम्हाला बदनाम करण्याचं हे षडयंत्र आहे. वकिलाची सनद असलेल्या अशा सुशिक्षित वकिलांनी असे आम्हाला बदनाम करण्यासाठी आरोप करू नये, असं देसाई म्हणाले.

यावेळी देसाईंना जागावाटपावरही भाष्य केलं. ते म्हणाले, जागावाटप होऊन लवकरच उमेदवारांची घोषणा होईल. महायुतीतील प्रमुख पक्ष व घटक पक्षांची चर्चा झालेली आहे. मागच्या वेळी आम्ही २२ जागा लढलो होतो आणि १८ जागा जिंकलो. आताही आमचा २२ जागांसाठी आग्रह आहे. आम्ही पक्ष म्हणून आमच्या जागांवर ठाम आहोत, असं देसाई म्हणाले.

ठाकरे गटाला खुश करण्यासाठी आरोप
तर संजय शिरसाट यांनीही सरोदेंच्या आरोपांवर भाष्य केलं. या पोपटांना काही ठिकाणी जागा मिळाली नाही. दोन आमदारांना मारहाण केली म्हणाले, एवढे सगळे आमदार सोबत होते. त्यांना जाऊन विचारा ना की, कुणाला मारहाण केली? एका एअर होस्टेसचा विनयभंग केल्याचे म्हणतात, बहुतेक त्यांना स्वप्न पडलं असावं… पोलीस, सुरक्षा, प्रसारमाध्यमे सर्वच असताना असं कसं होईल? दीड दोन वर्षानंतर याला जाग आली. उबाठा गटाचे नेते खूश होतील या भावनेतून हे आरोप केलेत, या आरोपांनाना कवडीचीही किंमत देत नाही, असं शिरसाट म्हणाले.

follow us