मुंबई : ‘राज्य सरकराने शेतकऱ्याला अडचणीतून बाहेर काढण्यासाठी मदतीची भूमिका घेतलेली आहे. असं असताना मुख्यमंत्री संवेदनशील नाहीत. अशा पद्धतीचा आरोप सभागृहामध्ये राजकीय उद्देशाने विरोधी पक्षाने केला. तो चुकीचा आहे. उलट या अगोदरच्या मुख्यमंत्र्यांपेक्षा हे मुख्यमंत्री अधिक संवेदनशील आहेत. असं मंत्री शंभूराज देसाई म्हणाले. ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या समस्यांवरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर केलेल्या आरोपांना उत्तर दिले.
यावेळी त्यांनी राज्य सरकारची भूमिका स्पष्ट करताना माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. अगोदरच्या मुख्यमंत्र्यांपेक्षा हे मुख्यमंत्री अधिक संवेदनशील आहेत. असं मंत्री शंभूराज देसाई म्हणाले.
त्याचबरोबर त्यांना यावेळी शेतकऱ्यांच्या विविध विषयांवर प्रश्न विचारण्यात आले. त्यावर ते म्हणाले, ‘शेतकऱ्याला ताबडतोब मदत द्या, शेतीचे पंचनामे करायला यंत्रणा नाहीत. वगैरे वगैरे अशा पद्धतीचे आरोप राजकीय दृष्टिकोनातून राजकीय भूमिकेतून केले. त्यावर महसूल मंत्री, सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन आणि मी आम्ही तिन्ही चारही मंत्र्यांनी सभागृहामध्ये सरकारची भूमिका मांडली. तसेच रोज सगळ्या अधिकाऱ्यांच्या कडून आढावा घेत आहोत.
Sanjay Raut : रक्तबंबाळ मुलीचा फोटो टाकण राऊतांना भोवलं; बार्शीत गुन्हा दाखल
विशेषतः मुख्यमंत्री शिंदे हे गारपीट झाल्यापासून सगळ्या विभागीय आयुक्तांबरोबर जिल्हाधिकाऱ्यांबरोबर थेट संपर्कामध्ये आहेत. जरी यंत्रणा सरकारी कर्मचारी संपावर असले तरी महसूलचे तलाठी मंडळ अधिकारी कृषी विभागाचे अधिकारी हे फिल्डवर आहेत. ते पंचनामे करत आहेत. असं देखील मंत्री शंभूराज देसाई म्हणाले.