Sanjay Raut : रक्तबंबाळ मुलीचा फोटो टाकण राऊतांना भोवलं; बार्शीत गुन्हा दाखल

  • Written By: Published:
Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 03 01T114436.095

FIR Against Thackeray Group MP Sanjay Raut In Barshi : रक्ताबंबाळ फोटो ट्वीट करणं ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या अंगलट आले आहे. आक्षेपार्ह फोटो सोशल मीडियावर (Social Media) ट्वीट केल्याप्रकरणी संजय राऊत यांच्या विरोधात बार्शीत (Barshi) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राऊतांच्या या फोटोनंतर त्यांच्यावर भाजपच्या चित्रा वाघ यांच्यासह अनेकांनी चहुबाजुंनी टीका केली होती.

बिश्नोईची पुन्हा धमकी; भाईजान सलमानच्या घराबाहेर पोलिसांचा खडा पहारा

ट्वीटमध्ये काय म्हणाले होते संजय राऊत? 

संजय राऊत यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले की, ‘देवेंद्रजी. हे चित्र बार्शीतले आहे.. मुलगी तुमच्या कुटुंबातील नाही म्हणून तिचे रक्त वाया जाऊ देऊ नका. भाजपा पुरस्कृत गुंडांनी हा जीवघेणा हल्ला केला आहे. अल्पवयीन मुलगी पारधी समाजाची आहे. गरिबांच्या मुली रस्त्यावर पडल्या आहेत ? 5 मार्चला हल्ला झाला. आरोपी मोकाट आहेत.’ खासदार संजय राऊत यांनी ट्विटमधून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केला होता. तसेच  ‘मुलगी तुमच्या कुटुंबातील नाही म्हणून तिचे रक्त वाया जाऊ देऊ नका.’ असे त्यांनी म्हटले होते.

Maharashtra Politics : राऊतांचे मानसिक संतुलन ढासळलेले; विखेंचा हल्लाबोल

राऊतांच्या या ट्वीटनंतर त्यांच्यावर चहुबाजूंनी टीका करण्यात आली. यात भाजप नेत्या चित्रा वाघ आणि आशिष शेलारांनी राऊतांवर जोरदार हल्लाबोल करत प्रत्युत्तर दिले होते. संजय राऊतांच्या आरोपाला भाजप नेते अशिष शेलार यांनी प्रत्युत्तर देताना ट्विटमध्ये म्हटले की, ‘प्रिय, संजुभाऊ, 6 मार्च रोजी झालेल्या या घटनेतील दोन्ही आरोपींना अवघ्या 12 तासात अटक करण्यात आली. याशिवाय, कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी दोन अधिकारी आणि दोन हेडकॉन्स्टेबल यांना 8 मार्च रोजीच निलंबित करण्यात आले असून, त्यांची चौकशी सुरू आहे.’

त्यांनी पुढं लिहिले की, ‘या घटनेची माहिती मिळताच, बार्शी पोलिसांनी सदर युवतीला वैद्यकीय मदत मिळवून दिली. तिला सोलापूर येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि आता तिच्या प्रकृतीत बर्‍यापैकी सुधारणा झाली आहे. हे भाजपा-शिवसेना युतीचे सरकार आहे, आरोपींचा बचाव करणारे महाविकास आघाडीचे नाही!’ असे प्रत्युत्तर अशिष शेलार यांनी संजय राऊतांच्या आरोपांना दिले आहे.

चित्रा वाघ आक्रमक

संजय राऊतांच्या ट्विटनंतर भाजप नेत्या चित्रा वाघ आक्रमक झाल्या आहेत. त्यांनी संजय राऊतांवर जोरदार टीका केली आहे. त्यांनी ट्विटमध्ये लिहिले की, ”ओ सर्वज्ञानी……खोटी माहीती देत का जनतेची दिशाभूल करताय…..?? सगळ्या पुड्या संपल्या का तुमच्या आता महिलांवर आलात.  या प्रकरणात दोन्ही आरोपींवर तात्काळ गुन्हा दाखल करत अटक झाली आता ही आरोपी जेलमध्ये आहेत ही वस्तुस्थिती असतांना का तुम्ही खोटी माहीती देताय…आरोपी भाजपपुरस्कृत म्हणता अहो आरोपी भाजपचं काय पण कुठल्याही पक्षाशी संबंधीत नाहीत…..१०३ दिवसांसाठी आत काय गेलात मती गुंग झाली तुमची…पिडीतांना जाती जातीत वाटणारे तुम्ही कोण ….? आमच्यासाठी पिडीता ही फक्त मुलगी असते व या घटनेतील मुलगी सुरक्षित आहे तिची तब्येतही स्थिर आहे. सगळ्यात महत्वाचं तुम्ही पिडीतेचा फोटो कसा काय viral केलात …?? आता कुठे गेले सगळे आम्हाला कायदे शिकवणारे असा सवाल उपस्थित केला होता.

शिंदे गद्दार नाही तर खुद्दार, सभेत मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरेंना सोडलंच नाही…

तसेच, महिला आयोग झोपलेत काय ? कधी पाठवतायं मग नोटीस या सर्वज्ञानींना कि त्या फक्त आमच्यासाठी आहेत ?? गृहमंत्री देवेंद्र फडणवीस व राज्य सरकार यांच्याकडे मागणी आहे तात्काळ या संजय राऊतांवर कारवाई करा…” संजय राऊत यांच्या टीकेला प्रत्युत्तर देत चित्रा वाघ यांनी रुपाली चाकणकर यांच्यावर देखील टीका केली.

Tags

follow us