Download App

शिंदेंनी ठाण्याच्या राजकारणाला दिशा दिली; दिल्लीत शरद पवारांकडून एकनाथ शिंदेवर स्तुतीसुमनं

Sharad Pawar यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कौतुक केलं ते नवी दिल्ली येथे महादजी शिंदे राष्ट्र गौरव पुरस्कार सोहळ्यातून बोलत होते.

  • Written By: Last Updated:

Sharad Pawar Appreciate Eknath Shinde at Delhi : शिंदेंनी ठाण्याचे राजकारण योग्य दिशेने नेण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले. असं म्हणत शरद पवार यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कौतुक केलं ते नवी दिल्ली येथे महादजी शिंदे राष्ट्र गौरव पुरस्कार सोहळ्यातून बोलत होते. या कार्यक्रमात शरद पवार यांच्या हस्ते एकनाथ शिंदे यांना महादजी शिंदे राष्ट्र गौरव पुरस्कार या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं.

EVM मधून डेटा डिलीट करू नका, सर्वोच्च न्यायालयाचे निवडणूक आयोगाला निर्देश

यावेळी बोलताना पवार म्हणाले की, आज एकनाथ शिंदे यांचा सन्मान होत आहे. ते सांगतात की, आम्ही सर्व सातारच्या आहोत. शिंदे जेव्हा ठाणे महानगरपालिकेमध्ये सभापती होते. तेव्हा त्यांनी ठाण्याचे राजकारण योग्य दिशेने नेण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले. त्यांच्यावर मोठी जबाबदारी होती. एकनाथ शिंदे यांनी सांगितलं की ते सातारचे आहेत. सातारने अनेक मुख्यमंत्री दिले मुंबई राज्याच्या मुख्यमंत्री देखील साताऱ्याचे होते.

ऋषिकेश सावंतचे गायब होणे ते घरी परतने; भाऊ गिरीराजने सांगितला संपूर्ण घटनाक्रम

त्यानंतर यशवंतराव चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, त्यानंतर एकनाथ शिंदे झाले. तसेच मी देखील सातारा जिल्ह्यातील नांदवड या गावातील आहे त्यामुळे मी देखील सातारा जिल्ह्यातीलच मुख्यमंत्री राहिलो. शिंदेंना महाराष्ट्राचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली केवळ महाराष्ट्रच नाहीतर वेगवेगळ्या क्षेत्रात महाराष्ट्र पुढे कसा जाईल याची काळजी त्यांनी घेतली. ठाणे मुंबई नवी मुंबई हा सर्व नागरी भाग आहे येथील प्रश्नांची जाण असलेला नेता म्हणजे एकनाथ शिंदे आहेत. अशी स्तुतीस्तुमनं शरद पवारांनी एकनाथ शिंदेंवर उधळल्याचं पाहायला मिळालं.

मोठी बातमी, LoC वर IED स्फोट; एका अधिकाऱ्यासह दोन लष्करी जवान शहीद

दरम्यान या कार्यक्रमात शरद पवार यांचे सासरे सदाशिव शिंदे हे क्रिकेटमध्ये गुगली टाकायचे तर शरद पवार हे राजकारणात गुगली टाकतात. त्यांची गुगली कधी कधी बाजूला बसलेल्या लोकांनाही कळत नाही पण माझा अनुभव वेगळा आहे. माझे पवार साहेबांशी प्रेमाची आणि जिव्हाळ्याचे संबंध आहेत. त्यामुळे त्यांनी मला कधीही गुगली टाकली आहे. यापुढेही ते टाकणार नाहीत. असं वक्तव्य एकनाथ शिंदे यांनी केलं.

follow us