ऋषिकेश सावंतचे गायब होणे ते घरी परतने; भाऊ गिरीराजने सांगितला संपूर्ण घटनाक्रम

ऋषिकेश सावंतचे गायब होणे ते घरी परतने; भाऊ गिरीराजने सांगितला संपूर्ण घटनाक्रम

Giriraj Sawant on Brother Rishiraj Sawant Bangkok tour : महाराष्ट्राचे माजी मंत्री आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या पक्षाचे शिवसेना आमदार तानाजी सावंत (Tanaji Sawant) हे त्यांचा मुलगा ऋषिकेश सावंत पुणे विमानतळावरून गायब झाल्याचे उघडकीस आल्यानंतर चर्चेत आलेत. यानंतर एकच खळबळ उडाली अन् बरंच नाट्य देखील घडलं. पोलिसांत अपहरणाचा गुन्हाही दाखल करण्यात आला. ऋषिकेश सावंत (Rishiraj Sawant) रात्री सुखरूप परतले. यावर ऋषीराज यांचे भाऊ गिरीराज यांनी घडलेल्या प्रकाराची माहिती दिली. हा तपास कसा केला गेला हे सांगितलं आहे.

मोठी बातमी, LoC वर IED स्फोट; एका अधिकाऱ्यासह दोन लष्करी जवान शहीद

यावेळी बोलताना गिरीराज म्हणाले की, सोमवारी दुपारी साडेतीन वाजता माझा लहान भाऊ ऋषिराज सावंत याचा मेसेज आला. मात्र त्यानंतर त्याचा फोन ट्रेस होत नव्हता. त्यामुळे आम्ही सर्व घरचे चिंतेत पडलो. अर्धा ते एक तास आम्ही सर्वांनी आमच्या स्तरावर तपास केला. मात्र कुठेच काही सापडत नाही म्हटल्यावर आम्ही याबाबत सिंहगड पोलीस स्टेशन मध्ये एफआयआर दाखल केला. अपहरणाचा गुन्हा दाखल केला.

भाजपचे हिंदुत्व फक्त निवडणुकीपुरतेच अन्… , आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल

दहा दिवसांपूर्वीच दुबई वरून परत आला होता. त्यानंतर आता त्याला कामानिमित्त बँकॉकला जायचं होतं. मात्र घरचे लगेचच बँकॉकला जाऊ देणार नाही. म्हणून तो न सांगता गेला. मात्र त्याला शोधण्यामध्ये पोलीस प्रशासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ या सर्वांच्या माध्यमातून त्याला शोधण्याला मदत झाली.

अर्थव्यवस्था, नोकरी अन् सुरक्षा, एआय समिटमध्ये मोदींनी दिला ‘गुरुमंत्र’

तसेच यावेळी पत्रकारांकडून गिरीराज यांना आपले वडील मंत्री असल्याने या सर्व यंत्रणेंचा गैरवापर केला गेला का असा प्रश्न विचारला असा त्यांनी सांगितलं की आई वडील म्हणून एवढी काळजी वाटणे सहाजिक आहे. आम्ही कोणताही गैरवापर केलेला नाही आणि प्रीतसर पोलीस प्रशासनाची मदत घेतली. त्यानंतर मुख्यमंत्री आणि इतरांनी मदत केली. अशी माहिती त्यांनी दिली.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube