Sharad Pawar Book on Ajit Pawar : ‘लोक माझे सांगाती’ या शरद पवारांच्या आत्मचरित्राची दुसरी आवृत्ती मंगळवारी प्रकाशित झाली. या कार्यक्रमानंतर शरद पवारांनी आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देत असल्याचं जाहीर केलं. मात्र, या दुसऱ्या आवृत्तीत अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या पहाटेच्या शपथविधीबद्दल आणि महाविकास आघाडीच्या स्थापनेबद्दल महत्त्वाचे खुलासे केले आहेत. त्यामुळे शरद पवार यांनी केलेला उल्लेख चर्चेत आहे.
पवार लोक माझें सांगाती या पुस्तकात म्हणतात, ‘भाजपा हा विश्वास ठेवण्यासारखा पक्ष नाही. 20214 मध्ये आमच्याशी बोलणी केली. पण शिवसेना सोबत सत्ता स्थापन केली. 2019 मध्ये देखील त्यांनी आमच्याशी संपर्क साधला पण आम्ही नकार दिला. हा नकार घेउन मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कडे गेलो होतो.’ असं पावारांनी लिहिलं आहे.
‘दरम्यान भाजप शिवसेनेची युती तुटल्यावर शिवसेनेने आमच्याशी बोलणी केली. त्यांच्या केंद्रीय मंत्री यांनी राजीनामा देत हा विश्वास दिला. मग महाविकास आघाडीची पायाभरणी झाली. काँग्रेस सेना आणि राष्ट्रवादीच्या महाघाडीसाठी मी सोनिया गांधी यांचे मन वळवलं. चर्चा सुरु होत्या. पण अंतिम निर्णय होत नव्हता. मल्लिकार्जुन खरगे यांच्यामुळे व्यथित झालो. मी बैठकीतून उठलो.’
दुसरीकडे मात्र याच घटना घडत असताना अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या पहाटेच्या शपथविधीबद्दल पवारांनी खुलासा केला की, ‘अजित पवार देखील निघून गेले. हे अनपेकक्षित होते. दुसऱ्या दिवशी सकाळी 6.30 वाजता अजित पवार यांच्या शपथविधी बाबत कळाल. केंद्र सरकार आणि राज्यपाल यांच्या मार्फत सरकार उलथून टाकण्याचा राज्यातील भाजपचा हा डाव होता. अजित पवार तापट आहे. त्याने तडकाफडकी हा निर्णय घेतला. श्रीनिवास पवार आणि प्रतिभा पवार यांनी अजितचे मन वळवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. प्रतिभा आणि अजित चे संबंध अतिशय जिव्हाळ्याचे आहेत. म्हणून वादावर पडदा पडला. पण अजित पवार यांनी आपल्या कर्तृत्वातून त्याची छाप प्रशासनावर पाडली आहे. यावेळी प्रतिभा पवार यांनी पहिल्यांदाच राजकिय निर्णयात सहभाग घेतला होता.’
ठाकरेंचं दोनवेळा मंत्रालयात जाणं हे… ‘लोक माझे सांगती’मध्ये पवारांनी काय लिहिलं?
दरम्यान अजित पवारांचं बंड शमल्यानंतर मुख्यमंत्रीपदासाठी एक चेहेरा लागतो. तो चेहेरा उद्धव ठाकरे होते. म्हणून त्यांना मुख्यमंत्री केले. कोरोना काळात उद्धव ठाकरे लोकप्रिय होते. मध्यमवर्ग त्यांच्या बाजूने होता. मंत्रालयातले कर्मचारी यांची ठाकरेंविषयी आपुलकी होती. पण त्यांचे दोनदा मंत्रालयात जाणे पचनी पडले नाही.
उद्धव ठाकरे यांच्याशी फारसा संपर्क होत नसे. त्यांची प्रकृती त्याला कारणीभूत होती. राज्याच्या प्रमुखचे सर्व घडामोडींवर लक्ष असावं, काय होणार याची माहिती हवी, काय निर्णय घ्यायचा हे कळायला हव याची उद्धव ठाकरे यांच्यात कमतरता जाणवली. राजीनामा देताना पहिल्या टप्यात त्यांनी माघार घेतली. उद्धव ठाकरे याना मुख्यमंत्री केल्याने शिवसेनेत डुफळी माजेल याची कल्पना नव्हती. शिवसेनेतील बंड शमवण्यात नेतृत्व कमी पडले.’
‘महाविकास आघाडी’चं सरकार हा फक्त सत्तेचा खेळ नव्हता. अन्य पक्षांना दडपून टाकत, लोकशाहीतल्या इतर पक्षांचं महत्त्व येनकेन प्रकारेण संपवत राजकीय वर्चस्व निर्माण करण्याच्या भाजपाच्या वृत्तीला ते सडेतोड उत्तर होतं. असा उल्लेख पवार यांनी केला आहे.