ठाकरेंचं दोनवेळा मंत्रालयात जाणं हे… ‘लोक माझे सांगती’मध्ये पवारांनी काय लिहिलं?
उद्धव ठाकरेंचं दोनवेळा मंत्रालायत जाणं हे आमच्या फारसं पचनी पडणारं नव्हतं, त्यांची प्रकृती डॉक्टरांच्या वेळांमुळे भेटण्यासाठी वेळ घ्यावी लागत होती, असा उल्लेख राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी ‘लोक माझे सांगती’ या पुस्तकात केला आहे.
‘लोक माझे सांगाती’ या शरद पवारांच्या आत्मचरित्राची दुसरी आवृत्ती आज प्रकाशित झाली. या कार्यक्रमानंतर शरद पवारांनी आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देत असल्याचं जाहीर केलं. मात्र, या दुसऱ्या आवृत्तीत उद्धव ठाकरेंबाबत शरद पवार यांनी केलेला उल्लेख चर्चेत आहे.
निवृत्तीच्या निर्णयावर फेरविचार करणार, पण….; पवारांचा निरोप येताच कार्यकर्त्यांचे आंदोलन मागे
उद्धव ठाकरे यांनी फक्त दोनवेळा मंत्रालयात जाणं हे आमच्या फारसं पचनी पडणारं नव्हतं. रश्मी ठाकरेंशी बोलताना उद्धव ठाकरेंच्या प्रकृतीचं वर्तमान समजत होतं. मी वडिलकीच्या नात्याने त्यांना भेटण्यासाठी मातोश्रीवर गेलो होतो. उद्धव ठाकरे यांची प्रकृती, त्यांच्या डॉक्टरांच्या वेळा यामुळे त्यांना भेटण्यासाठी वेळ घ्यावी लागत होती. असा उल्लेख शरद पवार यांनी लोक माझे सांगाती या पुस्तकात केला आहे.
Sharad Pawar Retirement : ‘तू गप्प राहा’ अजितदादा सुप्रियाताईला म्हणाले आणि…
राज्याच्या प्रमुखाला राज्यातल्या घडामोडींची बितंबातमी हवी. काय घडतंय यावर बारीक लक्ष हवं. उद्या काय होऊ शकेल याचा अंदाज घ्यायची क्षमता हवी आणि त्यानुसार आज काय पावलं उचलली पाहिजेत? हे ठरवायचं राजकीय चातुर्य हवं. या सगळ्याच बाबतीत आम्हाला कमतरता जाणवत होती. अनुभव नसल्याने हे सगळं घडत होतं तरीही हे टाळता आलं असतं असंही शरद पवारांनी या पुस्तकात म्हटलं आहे.
‘महाविकास आघाडी’चं सरकार हा फक्त सत्तेचा खेळ नव्हता. अन्य पक्षांना दडपून टाकत, लोकशाहीतल्या इतर पक्षांचं महत्त्व येनकेन प्रकारेण संपवत राजकीय वर्चस्व निर्माण करण्याच्या भाजपाच्या वृत्तीला ते सडेतोड उत्तर होतं, असा उल्लेख पवार यांनी केला आहे.