निवृत्तीच्या निर्णयावर फेरविचार करणार, पण….; पवारांचा निरोप येताच कार्यकर्त्यांचे आंदोलन मागे

निवृत्तीच्या निर्णयावर फेरविचार करणार, पण….; पवारांचा निरोप येताच कार्यकर्त्यांचे आंदोलन मागे

After Sharad Pawar’s appeal, the NCP activists demanded a strike : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (Nationalist Congress Party) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी आज निवृत्तीची घोषणा केली आहे. लोक माझे सांगाती या आत्मचरित्र पुस्तक प्रकाशन सोहळ्यात बोलतांना त्यांनी याबाबतची घोषणा केली. त्यानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. पवारांच्या निवृत्तीची घोषणा होताच अनेक कार्यकर्त्यांनी निर्णय मागे घेण्याची विनंती केली. मात्र, पवार आपल्या निर्णयावर ठाम राहिले. आणि ते सिल्वर ओकवर गेले. दरम्यान, कार्यकर्त्यांनी आंदोलन करायला सुरूवात केली होती. अखेर पवारांनी कार्यकर्त्यांना निरोप पाठवल्यानंतर कार्यकर्त्यांनी आपले आंदोलन मागे घेतले.

गेल्या 60 वर्षांपासून देशाच्या राजकारणात शरद पवार नावाचं घोंघावणारं वादळ आता संसदीय राजकारणात दिसणार नाही. योग्य वेळी भाकरी फिरवावी लागते, ती नाही फिरवली तर ती करपते, असं सुचकपणे शरद पवार म्हणाले होते. आज त्यांनी भाकरी फिरवण्याची सुरूवात स्वत:पासून केली. राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावरून निवृत्त असल्याचं सांगत पुन्हा निवडणुकीला उभं राहणार नाही, अशी घोषणा केली. कुठंतरी थांबण गरजेचं आहे, मी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या अध्यक्षपदावरून आणि संसदीय राजकारणातून निवृत्त होत असल्याचं सांगितलं यानंतर एकच गोंधळ उडाला. कार्यकर्ते आणि नेते भावूक झाले होते. निवृत्तीची निर्णय मागे घ्या, ही मागणी कार्यकर्त्यांनी केली. मात्र, पवार आपल्या निर्णयावर ठाम राहिले. पवारांच्या या निर्णयाला कार्यकर्त्यांनी विरोध दर्शवला.

Sharad Pawar : शरद पवारांचा काटेवाडी ते दिल्लीपर्यंतचा राजकीय प्रवास…

जोपर्यंत पवार साहेब आपला निर्णय बदललाणार नाहीत. तोपर्यंत आम्ही अन्न पाण्याशिवाय आंदोलन करणार असल्याची भूमिका कार्यकर्त्यांनी घेतली होती. त्यानुसार, वाय. बी. चव्हाण सेंटर परिसरात ठिय्या आंदोलन सुरू केले होते.

निर्णय जाहीर केल्यानंतर शरद पवार आपल्या सिल्वह ओक या निवासस्थानी गेले. मात्र, कार्यकर्त्यांनी अन्नपाण्याशिवाय आंदोलन करण्याच्या निर्णयावर ठाम होते. दरम्यान, खासदार सुप्रिया सुळे आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शरद पवारांची कार्यकर्त्यांप्रती असलेली भावना आंदोलकापर्यंत पोहोचवली. खासदार सुळे यांनी फोनवरून पवार आणि आंदोलक कार्यकर्त्यांचा संवाद घडवून आणला. त्यावेळी पवारांनी कार्यकर्त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यानंतरही कार्यकर्त्यांनी माघार घेण्याची तयारी दाखवली नाही.

दरम्यान, सिल्वह ओकवर पवार, अजित पवार, माजी मंत्री छगन भुजबळ, आमदार रोहित पवार यांच्याशी चर्चा केली. तसेच कार्यकर्त्यांच्या इच्छेचा मान राखून आपल्या निर्णयावर फेरविचार करण्यासाठी तीन दिवसांची मुदत मागितली आहे. मात्र, कार्यकर्त्यांना आपापल्या घरी गेले पाहिजे, अशी अट ठेवली. त्यांचे म्हणणे कार्यकर्त्यांना सांगण्यासाठी अजित पवार, खा. सुळे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, रोहित पवार हे पुन्हा आंदोलकांकडे आले. त्यावेळी अजित पवारांनी कार्यकर्त्यांचा निरोप सांगितला.

अजित पवार म्हणाले, पवार साहेबांनी सांगितले की, कार्यकर्त्यांनी हट्टीपणा केलेला चालणार नाही. त्यांच्यापेक्षा मी जास्त हट्टी आहे. माझा निर्णय मी दिलेला आहे. मात्र, मला फेरविचार करायला 2-3 दिवस लागतील, असं त्यांनी स्पष्ट केलं. आता कुणीही उपाशी राहू नये. त्यानंतर सर्वांना आपापल्या घरी जावे, अशी विनंती पवार साहेबांनी केली.

पवारांच्या या आवाहनास प्रतिसाद देत आंदोलक कार्यकर्त्यांनी आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर ते आंदोलन स्थळावरून उठले. दरम्यान, आता दोन-तीन दिवसानंतर आपली पुढची भूमिका काय घेतात, हेच पाहणं महत्वाचं आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube